चित्रा न्युज प्रतिनिधी
मुंबई/कोल्हापूर:'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या जुलै महिन्यारोख्या निधीसाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती (SC) घटकातील महिलांसाठी आरक्षित असलेला तब्बल ३१९ कोटी ५३ लाखांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. मागासवर्गीय घटकांच्या विकासासाठी असलेला हा हक्काचा निधी इतरत्र वळवण्यात आल्याने दलित वर्तुळातून आणि सामाजिक संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाविरोधात पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष संतोषदादा आठवले यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री तथा संबंधित शासनाला निवेदन पाठवले आहे. तसेच राज्य शासनाच्या या grievance पोर्टलवर अधिकृत तक्रारही नोंदवण्यात आली आहे.
नेमका आक्षेप काय?
संघटना स्पष्ट करते की, आमचा कधीही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या किंवा 'लाडकी बहीण' योजनेच्या विरोधाभासात सहभाग नाही. परंतु, इतर मागासवर्गीय व दलित घटकांच्या हक्काचा निधी अशा प्रकारे परस्पर डायव्हर्ट करणे हा थेट संवैधानिक अधिकारांवर मोठा आघात असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
विकासकामांना खिळ बसण्याची शक्यता
सामाजिक न्याय विभागाचा निधी अशा प्रकारे वळवल्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या:
शिष्यवृत्ती (Scholarships)
वसतिगृहे (Hostels)
कौशल्य विकास योजना
इतर महत्त्वपूर्ण कल्याणकारी योजना रखडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
आधीच हक्काच्या निधीसाठी संघर्ष करावा लागत असताना, आता उपलब्ध निधीही अन्य योजनेसाठी वापरल्यामुळे मूळ घटकांच्या विकासाला मोठी खिळ बसणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पँथर आर्मीची तातडीची मागणी व आंदोलनाचा इशारा
शासनाकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:
मागासवर्गीय घटकांच्या विकासाचा निधी इतर योजनांसाठी वळवणे तात्काळ थांबवण्यात यावे.
सामाजिक न्याय विभागाचा निधी केवळ आणि केवळ संबंधित मागासवर्गीय घटकांच्या हक्कासाठीच पूर्णपणे सुरक्षित ठेवावा.
जर शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही, तर पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड दमही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


0 टिप्पण्या