Ticker

6/recent/ticker-posts

शुक्रवारपासून दोन दिवशीय वर्धा ग्रंथोत्सवाचे आयोजन

महोत्सवात ग्रंथ प्रदर्शन व विक्री

गजल मुशायरा, एकपात्री, कथा कथन

सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894

वर्धा: जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने येथील सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा वाचनालयात दोन दिवशीय वर्धा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ग्रंथ दालनांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. खा.रामदास तडस यांच्याहस्ते दि. 2 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होईल.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा.प्रदीप दाते राहतील तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्वश्री आमदार नागोराव गाणार, रामदास आंबटकर, अभिजीत वंजारी, रणजित कांबळे, डॅा.पंकज भोयर, दादाराव केचे, समीर कुणावार, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक नूरुल हसन, सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, ग्रंथालय संघाचे राज्याध्यक्ष प्रा.गजाजन कोटेवार, बजाज सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रदीप बजाज, सहाय्यक ग्रंथालय संचालक मिनाक्षी कांबळे उपस्थित राहतील.
तत्पुर्वी सकाळी 9 वाजता जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथून बजाज वाचनालय पर्यंत ग्रंथदिंडी काढली जाणार आहे. या दिंडीचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले करतील. याच दिवशी दुपारी 3 वाजता बालकवी संमेलन व बाल काव्य वाचन स्पर्धा होईल. सायंकाळी 6 वाजता नाट्य महोत्सव व मराठी पाऊल पडते पुढे हा कार्यक्रम होईल.
शनिवार दि.3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता अमरावती येथील अंध कलावंत रिजवान पटेल यांचा एकपात्री प्रयोग होईल. सकाळी 11 वाजता कथा कथन होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.किशोर वानखडे राहतील तर अभिजित डाखोरे, डॅा.स्मिता वानखेडे, आशिष वरघणे, सुषमा पाखरे सहभागी होतील. दुपारी 2 वाजता गजल मुशायरा होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय इंगळे तिगावकर राहतील तर नितीन वायाळ, डॅा.रुपेश देशमुख, दिलीप गायकवाड, महेन महाजन, प्रकाश बनसोड, प्रिती वाडीभस्मे, तेजस भातकुलकर, वृषाली मारतोडे, कांचन कानतोडे इत्यादी कवी सहभागी होतील.
सायंकाळी 5 वाजता ग्रंथोत्सवाचा समारोप व बक्षिस वितरण होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे राहतील तर पाहुणे म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॅा.अतुल दोड, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरज बारापात्रे, ग्रंथालय संघाचे राज्याध्यक्ष प्रा.गजानन कोटेवार, अमरावतीचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॅा.सुरज मडावी उपस्थित राहणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजन समितीच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या