Ticker

6/recent/ticker-posts

मतदार यादी निरिक्षकांची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक

सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894

वर्धा: मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी विभागीय आयुक्तांना मतदार यादी निरिक्षक म्हणून नेमन्यात आले आहे. मतदार नोंदणीचा आढावा व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करण्यासाठी निरिक्षक दि. 2 डिसेंबर रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त यांना मतदार यादी निरिक्षक म्हणुन नियुक्त करण्यात आलेले आहे. दि.1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या कालावधीत मतदार यादी निरिक्षक विभागातील विविध जिल्ह्यांना भेटी देणार आहे. यासाठी विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरिक्षक दि.2 डिसेंबर रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.
विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरिक्षक 2 डिसेंबर रोजी  दुपारी 12 वाजता खासदार, आमदारांसह राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीस उपस्थित राहणार आहे. यावेळी सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी सुध्दा उपस्थित राहणार आहेस, असे उपजिल्हा निवडणुक अधिकारी प्रविण महिरे यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या