Ticker

6/recent/ticker-posts

रणजीत बारहाळीकर यांना कुशल संघटक पुरस्कार जाहीर

 

३० नोव्हेंबर रोजी श्रिरामपुर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार पुरस्कार सन्मान सोहळा

चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो ८८८८११७९७५

नांदेड -: मुखेड तालुक्यातील सामाजीक चळवळीतील भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रणजीत बारहाळीकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला, तरुण, कर्मचारी या सर्वांचे संघटन करून संघटना वाढीस भरीव योगदान देवून समाज कार्यासाठी रणजीत बारहाळीकर यांना भारतीय लहुजी सेनेच्या वत्तीने देण्यात येणारा कुशल संघटक हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
रणजीत बारहाळीकर हे मराठवाड्यात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजीक चळवळीत काम करतात आपल्या माध्यमातून समाजातील शोषीत, पिढीत, अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत संघर्ष करीत असतात.

रणजीत बारहाळीकर हे तालुक्यातील सामाजिक चळवळीच्या योगदानात महत्त्वपूर्ण असलेल्या लोकचळवळीसाठी वेळ देवून समाजातील शोषीत पिडीतांचे न्याय हक्क संवर्धित राहण्यासाठी सातत्याने कार्यरत राहून लोकांना न्याय देण्यासाठी करत असलेल्या भरीव अश्या योगदानाचा विचार करून व तसेच भारतीय लहुजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेसाठी करीत असलेल्या योगदानाबद्दल अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला " कुशल संघटक " ह्या पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

 दि .३० नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक श्रीरामपूर येथे सायंकाळी ७ वाजता राज्यातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय लहुजी सेनेचे सरसेनापती मा. व्हि. जी. रेड्डी साहेब भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल ,राष्ट्रीय सचिव हनिफभाई पठाण, कायदेशिर सल्लागार अँड. आर.बी. कोळेकर , यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे रणजीत बारहाळीकर यांना कुशल संघटक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या