Ticker

6/recent/ticker-posts

सम्राट अशोक सेनेच्या वतीने व संपूर्ण सामाजिक संघटनेच्या वतीने अर्धनग्न भव्य आंदोलन

रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५

अकोला :- सम्राट अशोक सेनेच्या वतीने व संपूर्ण सामाजिक संघटनेच्या वतीने,सर्व शेतकऱ्यांच्या भूमिहीनांच्या न्याय हक्कासाठी अर्धनग्न भव्य आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये,तेल्हारा,बार्शीटाळी, मूर्तिजापुर,अकोट,बाळापूर तालुका अकोला जिल्ह्यातील,मोठ्या संख्येने सर्व,SC,ST,OBC,NT,सर्व जाती-धर्माचे शेतकरी सहभाग झाले,विषय भुमिहीन ई क्लास अतिक्रमणधारक यांचे वतीने बुधवार दि.३०/११/२०२२,जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे खालील विषयावर आंदोलन करण्यात आले आहे,हे प्रशासन शेतकऱ्याचे आत्महत्या होण्याची वाट पाहत आहे का.? भूमिहीनांना बेघर करण्याचे हे काम करत आहेत का.?.व्याजाने पैसे काढून सोन चांदी सोनाराकडे सावकाराकडे गिरवी ठेवून गहाण ठेवून,रात दिवस कष्ट करून मोलमजुरी करून,हे भूमिहीन आपला परिवार दोन वेळेस अन्न खाऊ शकेल म्हणून रात दिवस याच गायरान जमिनीवर या शेतीवर आपले पोट भरले पाहिजेत म्हणून कष्ट करत आहे, त्याच कष्टकरी शेतकरी राजाला आज हे सरकार आत्महत्या करण्यासाठी, मजबूर करत आहे,यांना बेहाल करत आहे शेतकरी आत्महत्या करायला निघाला आहे याचा जिम्मेदार कोण.?. एकीकडे या महाराष्ट्रातले सर्व रोजगार, उद्योगधंदे,गुजरात सारख्या वेगवेगळ्या राज्यात जात आहेत,युवा वर्गाच्या हाताला काम नाही रोजगार नाही युवा वर्ग बेहाल झाला रिकामा झाला त्याच्या हाताला काम नाही,कसेही शेतीत जाऊन दोन वेळेचा अनाज मिळणार म्हणून तो गायरान ई क्लास जमीन काढून आपला परिवार चालवण्याचे गेल्या 70 वर्षापासून काम करत आहे,परंतु आता हे प्रशासन याच भूमिहीनांना उध्वस्त करत आहे, शेतकऱ्याला रस्त्यावर येण्याचा प्रसंग या प्रशासनामुळे होत आहे, शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर त्याच्या आत्महत्येची दखल एकही राजकीय पक्ष घेत नाही का घेत नाही.?. शेतकऱ्यांचे तुम्हाला फक्त मतदान पाहिजेत का शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर का येत नाही.?,आमच्या मागण्या आहेत की शासनाच्या दुर्लक्षीत धोरणांमुळे ज्या अतिक्रमणधारकांचे पट्टे जी.आर नुसार करण्याचे राहीले होते ते नव्याने करणे बाबत.जे ईक्लास अतिक्रमणधारक शासनाच्या जीआर नुसार बसत नाही त्यांना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भुमिहीनांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना भूमिहीनांना देवू शेती २ एकर बागायती,चार एकर करोडोवाहू,कष्ट करणाऱ्यांना हिम्मत देवू ह्या शासनाच्या योजनेमध्ये सर्व भूमिहीन ई क्लास अतिक्रमण धारकांना बसवण्यात यावे व सर्व प्रथम प्राधान्य देण्यात यावे.ई क्लास जमिनीवर भुमिहीनांनी वहीतीस केलेल्या जमिनीवर ताबा हक्क अधिकार कायम करून नावे होण्याबाबत.नागरीकांना घरकुल चा लाभ व रक्कम वाढून द्यावे,घरकुलाकरीता जागा मिळणे. शासन निर्णय क्र.२०४/२०२१ C,R,V, भुस्कुटे दि 2014 नुसार गाव निहाय यांनी वहिती केलेली जमीन त्यांच्या पाल्याच्या नावे करण्यात याव्यात. सरकारी क्लास व गावरान जमिनीवर शेतीसाठी असलेल्या अनेक अतिक्रमण धारकांना विद्यमान दिवानी न्यायालय महाराष्ट्र शासन विरुद्ध केसेस दाखल आहेत व सर्व दाखल प्रकरणे ही न्यायप्रविष्ट आहेत.अनेक जमिनीचे वाद न्यायप्रविष्ट आहेत. याचाही विचार भान करण्यात यावा, या भूमिहीनांना अतिक्रमण धारकांना जमीन मिळेपर्यंत आमचा हा संघर्ष आमचा हा लढा चालूच राहणार असाच आम्ही इशारा देतो सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा शिरसाट जमीन आमच्या हक्काची.नाही कुणाच्या बापाची,जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है, यही हमारी मांग है,जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची,बंद करो बंद करो ये अन्य बंद करो

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या