सरगम शाहारे विशेष प्रतिनिधी गोंदिया जिल्हा मो.9158172958
गोंदिया:-सपुंर्ण महाराष्ट्र राज्यभर आयोजित संविधान दिनानिमित्त संविधान गुणगौरव परीक्षा यांच्या संयुक्त विद्यमाने "संविधान गुणगौरव परीक्षा 2022" आपले ध्येय संविधान जनजागृतीसाठी भावी पिढीच्या उत्कर्षासाठी, संविधानिक आदर्श व मूल्याची ओळख करून देण्याच्या उद्देशाने आज दिनांक 26 नोव्हेंबर 2002 रोजी दु.12 वा.संविधान स्वीकृती दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय संविधान गुणगौरव परीक्षा 2022 अंतर्गत परीक्षार्थी जि. प.हायस्कूल तथा विज्ञान व आर्ट्स महाविद्यालय नवेगाव बांध येथे उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.33 परीक्षार्थी पैकी 28 परीक्षार्थी परीक्षा दिली.
केंद्रप्रमुख म्हणून सरगम शाहारे यांनी काम पाहिले.तर परिक्षा केंद्रावर संचालक म्हणून गायत्री कवारे यानी काम पाहिले.परिक्षेला नगर बौद्ध समाजाचे अध्यक्ष -रेवचंद शहारे,सचिव- देवदास बडोले, सामाजिक कार्यकर्ते -हेमचंद लाडे, अजित साखरे यांच्या उपस्थितीत परिक्षा संपन्न झाली.


0 टिप्पण्या