Ticker

6/recent/ticker-posts

गायरानअतिक्रमण धारकाच्या बाजूने लढणारे ॲड.डॉ.अरुण जाधव यांच्या लढ्याला यश... मी शेतकरी गणपत कराळे

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098


अहमदनगर :- 
               महाराष्ट्रातील गायरान अतिक्रमण जमिनी निष्कशित करा या उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे....
              महाराष्ट्रातील सर्व गायरान अतिक्रमण धारक भयभीत झाले होते. देशाला स्वातंत्र्य मिळून *75* वर्ष पूर्ण झाले आहे. तरी काबाड कष्टाने मेहनतीने ऊस तोडून,वीटभट्टी काम करून,लोकांच्या येथे साल धरून,मजुरी करून रक्ताचे पाणी हाडाचे काड.. करून मुलाबाळांसाठी कुटुंबासाठी निवारा बनवला तोही या उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पडणार म्हटल्यावर.. गोरगरीब कष्टकरी शेतमजूर अतिक्रमण धारक चिंनतेत होते.काही लोकांनी जेवण बंद केले होते . माता भगिनी रडत होत्या कोणाला तर हृदयाचा,डायबिटीज बीपी याचा आजार होता. या सर्व जनतेची हाल अपेष्टा तळमळ जाणून...
         जामखेड तालुक्यातील *निधड्या छातीचा एक अनाथ कार्यकर्ता ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव* यांनी जामखेड, कर्जत,श्रीगोंदा या तीन तालुक्यातील गायरान अतिक्रमण धारकांना धीर देण्यासाठी रात्र आणि दिवस प्रत्येक गावात जाऊन लोकांना समजून सांगत होते.*धीर देत होते* या लोकांच्या वेदना बघून अरुण जाधव यांचा जीव कासावीस होत होता.
          परंतु संविधानाच्या मार्गाने ॲड.डॉ.अरुण जाधव यांनी या *जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी* जामखेड, कर्जत,श्रीगोंदा या तीन तालुक्यातील तहसील कार्यालयावर गायरानअतिक्रमण धारकांना घेऊन *जन आक्रोश मोर्चा मोठ्या संख्येने काढला* प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांना ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव यांच्या नेतृत्वाखाली गायरान अतिक्रमण धारकांकडून निवेदन दिले. महाराष्ट्र सरकारने अतिक्रमण धारकाच्या बाजूने सुप्रीम कोर्टात रिव्ह पिटीशन दाखल करावे अशी मागणी गायरान अतिक्रमण धारकाच्या बाजूने ॲड.डॉ.अरुण जाधव यांनी केली.
        *अखेर जन आक्रोश मोर्चामुळे ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव यांच्या लढ्याला यश....*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या