Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव आंदोलन !


दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
    
मुंबई :-वसई विरार वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नालासोपारा शहराध्यक्ष समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली वसई विरार महानगरपालिका अध्यक्ष गीताताई जाधव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याविरोधात निषेध मोर्चा नालासोपारा उड्डाणपूलाखाली त्याच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यात आला. 

यावेळी राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचावच्या घोषणा देण्यात आल्या. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपली खुर्ची खाली करावी. तसेच जोपर्यंत राज्यपाल माफी मागत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्र भर करण्यात येणार असल्याचे गीता जाधव यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मसमभाव या विचाराने चालत होते, जातीभेद करीत नव्हते. महाराजांची बदनामी मुस्लीम समाज कदापि सहन करणार नाही, असे जावेद खान यांनी सांगितले. 

भारतामधील महापुरुषयांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य करेल, त्याला महाराष्ट्राचीच काय तर संपूर्ण भारताची जनता अजिबात खपवून घेणार नाही, अशांना अजिबात सहन करून घेणार नाही असे वक्तव्य सुविध पवार युवा कार्यकर्ते यांनी केले. 

यावेळी राजू वटार, सोनू शेख, सुविध पवार, मनोज रुके, जावेद खान, प्रेरणा भेकरे, वनमाला जामनिक, रेश्मा कहार, साक्षी जाधव, सरिता बिंद, मनीषा पवार, गौतम वाकोडे, सागर घोलप, समीर शेख, जाफर शेख, अदीक शेख, सादिक शेख, नौशाद शेख, जावेद शेख, आरिफ शेख, शाहिद शेख, अण्णा भाई, हरेश जाधव, रुपेश भाई, दाऊद भाई, अरुण शेख, मेहबूब खान, शोभा वानखेडे, रूपाली कांबळे, सुजाता कदम, दुर्गा कांबळे, वर्षा शिंदे, दीपक जयस्वाल, विशाल गौतम, बलवीर यादव, सारिका कांबळे, रेखा रवते, लीगल ॲडव्हायझर समाजसेवक दाऊद कलाडिया, मीरा वहार, युवराज चव्हाण, अमित माने, मिसेस माने, बिपिन रूके, समीर शेख, 

यांच्यासह अनेक मुस्लीम बांधव व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि बहुजन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या