रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
परभणी : नूतन विद्या समिती संचलित शिवाजी नगरातील मराठवाडा हायस्कूलचा माजी विद्यार्थी अजय लक्ष्मणराव वाहूळे यांनी युपीएससी परिक्षेत ऑल इंडिया रँक मध्ये 40 वा क्रमांक पटकावून इतिहास रचला.
प्रचंड अभ्यासू, महेनती व जिद्द असणार्या या विद्यार्थ्याचा युपीएससी परिक्षेत मिळविलेल्या या प्रेरणादायी यशाबद्दल संस्थेसह मराठवाडा हायस्कूलच्यावतीने मंगळवारी (दि.27) सहकुटूंब सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्रशालाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अनंत पांडे, नूतन विद्या समितीचे उपाध्यक्ष दिलीपराव कुलकर्णी, संचालक व्यंकटेश तोरंबेकर, उपमुख्याध्यापक बाळकृष्ण कापरे, पर्यवेक्षक शिवाजी आरळकर, सूर्यकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आजच्या या कौटुंबिक शालेय स्तरावरील सत्कार प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अजय वाहूळे यांनी आपण या शाळेतील शिस्तीमुळे घडलो आहोत, असे नमूद करीत शाळेचा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये खूप मोठा वाटा असतो, असे म्हटले. याप्रसंगी अजय यांची आई श्रीमती उज्वला लक्ष्मणराव वाहूळे, बहीण अंजली वाहूळे, सुदर्शनराव शिंदे, सौ.घोडे यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
दरम्यान, अजय वाहुळे यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय जोशी, उपाध्यक्ष अनिलराव आष्टूरकर, दिलीपराव कुलकर्णी, सचिव संतोष धारासुरकर, कोषाध्यक्ष श्रीनिवास मुंदडा, सहसचिव तथा प्राचार्य अनंत पांडे, संचालक व्यंकटेश तोरंबेकर, प्रशालेचे उपमुख्याध्यापक बि. पी. कापरे, शिवाजी आरळकर, सौ. तनुजा कापरे, सुर्यकांत पाटील, एन.एल.साळवे, गणेश काळबांडे, सुनील रामपूरकर, अभिजीत कुलकर्णी, विश्वास दिवाळकर आदींनी अभिनंदन केले.
सूत्रसंचालन गोपाळ रोडे यांनी तर आभार डॉ. सुनील तुरुकमाने यांनी मानले.


0 टिप्पण्या