Ticker

6/recent/ticker-posts

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास स्वच्छतेचा प्रथम पुरस्कार

सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894


 हिंगोली :  हिंगोली नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी  अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण मोहिम राबविण्यात आली होती. या अभियानात सर्वात स्वच्छ कार्यालयाचा प्रथम पुरस्कार सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय,हिंगोली यांना मिळाला आहे. 
त्यानिमित्त हिंगोली नगर परिषदेमार्फत आयोजित समारंभात सर्वात स्वच्छ कार्यालय प्रथम पारितोषक पुरस्कार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे.  
 यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या