Ticker

6/recent/ticker-posts

रोजकीर्दी जमा धरूनी सकळ खताविला काळ वरावरी

🚩 रोजकीर्दी जमा धरूनी
           सकळ
   खताविला काळ वरावरी

    आयुष्याचा किती काळ हरि चिंतनात गेला आणि किती  काळ 
 'तुझे माझे' म्हणण्यात फुकट गेला; या सर्वांचा जमाखर्च 
रोजकीर्दीत लिहून ठेवला ......
  पुनः त्याची खातेवार खतावणी 
केली ......
  त्यामुळे वर्षाच्या शेवटी जमा
खर्चाची तोंड मिळवणी  करून ती
देवासमोर मांडण्याचा त्रास शिल्लक राहिला नाही.......
  माझी प्रेममय सेवा देवासमोर
रूजू झाली आहे.....
  त्यावाचून काही रदबदली करणे
अथवा अट्टाहास करणे,हे चोरी
करण्यासारखे आहे.....
  अनेकांचे दास्य करत जगण्याला
आग लागो......
  तुकाराम महाराज म्हणतात, मी
माझ्या मनाशी प्रामाणिकपणे
सावध आहे.......
  त्यामुळे निश्चित जीवन जगत
आहे......
  वर्षा अखेरच्या लंचाड्यात 
गुंतण्याचे कारण राहिले नाही....
🙏 *शुभ सकाळ*🙏
 🌼 *पंढरीचा वारकरी*🌼

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या