Ticker

6/recent/ticker-posts

पालांदूर परिसरात हत्तीचे कळपाचा धुमाकूळ

अनेक गावातील धानाचे पूजणे, पाइपाचे नुकसान


कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :-लाखनी तालुक्यातील सहवनक्षेत्र लाखनी आणि किटाडी अंतर्गत येणाऱ्या अनेक गावातील शेतशिवारात जंगली हत्तीने आपला मोर्चा वळवून धानाचे पुजणे, मळणी केलेले धानाचे पोते, शेतातील पाइप लाईन ची नासधूस केल्याची घटना सोमवार(ता.५) सकाळचे सुमारास उघडकीस आली. वन, महसूल व कृषी विभागाकडून संयुक्त पंचनामे करण्याचे काम सुरू असून हत्तीच्या कळपाचे हालचालींवर ड्रोन द्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. 
          सहवनक्षेत्र किटाडी चे अधिनस्त असलेल्या खराशी, धानला, घोडेझरी, खूनारी, निमगाव तसेच सहवनक्षेत्र लाखनी चे अधिनस्त असलेल्या रामपुरी, मुरमाडी/तूप., कन्हाळगाव येथील अनेक शेतकऱ्यांचे हत्तीच्या कळपाने रविवारी रात्रीचे सुमारास शेतशिवारात ठेवलेले धानाचे पुजणे, मळणी करून खळ्यावर पोत्यात ठेवलेले धान, शेतातील पाइप लाईन, स्वीच पेटी तर काही गावात ऊस शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. नुकसानीचा आकडा लाखोच्या घरात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वन अधिकारी व कर्मचाऱ्यांची हत्तीच्या कळपाचे लोकेशन वर २४ तास नजर असून रात्री हत्तीचा कळप गावात शिरू नये. याकरिता फटाके फोडून हत्तीच्या कळपास गावात येण्यापासून मज्जाव केला जातो. वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे, सूरज गोखले यांचे मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक मुकेश श्यामकुवर, जे.एन. बघेले, वनरक्षक गोवर्धन सोनटक्के, रंगारी मॅडम, पारधी, गायकवाड, कुंभरे, बडोले मॅडम, गायधने मॅडम यांचे मार्फत संबंधित तलाठी व कृषी सहाय्यकाचे सहकार्याने युद्ध पातळीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्यामुळे शेतकरी संख्या व नुकसानीचा निश्चित आकडा करू शकला नाही. 
*ड्रोन द्वारे हत्तीच्या कळपावर नजर(चौकट)* 
सूर्यास्तानंतर हत्तीचा कळप वनक्षेत्राबाहेर निघून शेतशिवारात प्रवेश करून नुकसान करीत असल्यामुळे वन विभागाद्वारे हत्तीच्या कळपावर नजर ठेवणे अशक्यप्राय बाब असल्यामुळे कमीतकमी वित्तहानी तथा जीवितहानी होऊ नये. या करिता हत्तीचे कळपाचे हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाद्वारे ड्रोन ची मदत घेतली जात आहे.
*हत्तीचा कळप परतीच्या प्रवासात(चौकट)*
२३ संख्येत असलेल्या हत्तीच्या कळपाचा लाखनी व साकोली वन परिक्षेत्राचे सीमेवर आठवडा भरापासून धुमाकूळ सुरू होता. रविवारी रात्री पालांदुर परिसरात शेतकऱ्यांचे नुकसान करून चूलबंद नदी ओलांडून ज्या मार्गे इकडे दाखल झाला होता. त्याच मार्गाने परत जाणार असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर एका वन अधिकाऱ्याने सांगितले. 
*प्रतिक्रिया/स्टेटमेंट(चौकट)*
हत्तीचा कळप वनक्षेत्रालगत असलेल्या शेत शिवारातीलच नुकसान करीत होता. पण मागील २ दिवसापासून १० ते १२ किमी परिसरात जाऊन नुकसान करीत असल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी वन विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. 
*आकाश कोरे, माजी जि. प. सदस्य*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या