औरंगाबाद :- पैठण पोलीस ठाणेच्या हद्दीत बनावट लग्न लाऊन नवरदेवाला व त्याच्या परिवाराला लुटण्याची घटना पैठण परिसरात घडत आसल्याने मा.पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी दिलेल्या सुचना आणि मार्गदर्शनाप्रमाने पैठण पोलीस निरिक्षक किशोर पवार यांनी अपल्या अधिनिस्त पोलीस अंमलदार यांना कामकाज करण्याचे आदेश देवुन त्या अनुषंगाने पैठण शहर व हद्दीत पेट्रोलींग करण्याचे आदेश असताना दि.३/१२/२०२२ रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास पैठण येथील नाथ मंदीर पार्कींग परिसरात काही संशयीत व्यक्ती लग्नाचा बनाव करत आसल्याची माहिती मिळाल्याने पेट्रोलींग पोलीस पथकाने सदर घटनास्थळी वधु व वराच्या वेषात आसलेल्या व्यक्तींची विचारपुस केली असता वधु पक्षाकडील व्यक्तींने उडवा उडवीचे उत्तरे दिली.त्यामुळे पैठण पोलीसांचा सदर बनावट लग्नाबाबत संशय वाढल्याने वधु व वर पक्षातील लोकांना पोलीस ठाणे पैठण येथे आणुन सखोल चौकशी केली असता. प्रकाश गणेश मोरे (व २४ वर्ष रा.टाकेशिवनी ता.शिंदखेडराजा जि.बुलढाणा) या युवकाचे लग्न जुळत नसल्याने आंबादास नवनाथ नागरे( रा.दहेगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर ह.मु.नाराळा पैठण ता.पैठण) याने प्रकाश मोरे यांच्या वडीलांना माझ्या परिचयाची एक मुलगी असुन तीला आई वडील नाही व एक भाऊ आहे.ती मुलगी परिस्थितीने गरीब आहे.तरी तुमच्या मुलाचे त्या मुलीचे तुमच्या मुलासोबत लग्न लावुन देतो.त्या मोबदल्यात १,५०,००० रुपये द्यावे लागतील.असे म्हणुन काल रोजी मुलगी पाहण्यासाठी पैठण येथे बोलावुन लग्नाची तयारी करण्यासाठी सोन्याचांदीचे दागीने व कपडे असे १८,७५८ रुपयाची खरेदी करण्यास भाग पाडून स्वत:कडे घेऊन फिर्यादी पक्षाची फसवणुक केल्याची फिर्याद प्रकाश गणेश मोरे याने दिल्यावरुन आरोपी क्र (१) आंबादास नवनाथ नागरे (रा.दादेगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर ह.मु नाराळा पैठण ता.पैठण),(२) राजु अंकुश चाबुकस्वार (वय ३९ वर्ष रा.चन्नापुरी ता.अंबड जि.जालना),(३) शिला महादेव बनकर (वय ३५ वर्ष रा.एकतुनी ता.पैठण जि.औरंगाबाद),(४) उमेश गणेश गिरी (वय २२ वर्ष रा.तिर्थपुरी ता.घनसांवगी जि.जालना) या चारही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोउपनि संजय मदने,पोना जिवडे,आदी करत आहेत.यातील नमुद चारही आरोपी हे वेगवेगळ्या जातिधर्माचे आसताना त्यांनी फिर्यादीस वधु ही त्याच्या जातीधर्माची आसल्याची बनावनी करुन लग्नासाठी तयार केल्याचे त्यातुन स्वत:चा आर्थिक लाभ मिळवण्यासाठी बनावट लग्नाचा बनाव करुन फिर्यादीची फसवणुक केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे.तसेच त्यातील बनावट लग्न टोळीतीळ आरोपींनी त्यांच्या वास्तव्याचे जिल्हे औरंगाबाद,जालना,अहमदनगर येथे तसेच परराज्यातुन देखील यापुर्वी अशा प्रकारचे बनावट लग्न केले आसल्याचा संशय असुन त्या मुद्यावर तपास चालु आहे.सदरची कामगीरी मा.पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया,अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार,उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक किशोर पवार,पोउपनि स्वाती लहाने,पोउपनि संजय मदने,पोहेकाँ सुधिर ओव्हळ,पोअं सचिन आगलावे,पोअं मुजस्सर पठाण,पोअं बाबासाहेब शिंदे यांनी केली आहे.


0 टिप्पण्या