रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
औरंगाबाद:- औरंगाबाद विभागास शेततळे खोदकामाचा लक्षांक प्राप्त झालेला असुन जिल्हास्तरावरून तालुका निहाय लक्षांक देण्यात आला आहे. शेतकरी, लाभार्थ्यांची निवड महा-डीबीटी प्रणालीवर अर्ज करावेत, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक डॉ. डि.एल.जाधव यांनी केले आहे.
राज्यातील 82 टक्के शेती ही सर्वस्वी पावसावर अवलंबून असलेली कोरडवाहू शेती आहे. पावसाच्या अनिश्तिीमुळे व पावसाचा खंड पडल्यामुळे सिंचनाअभावी पिक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते, पर्यायाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. जेंव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तेव्हा नदी, नाले, ओढेव्दारे वाहून जाणारा अपधाव उपसून त्याची साठवणूक करण्यासाठी शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करण्यास चालना देणे हा यावरील उपाय आहे. सद्यस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांना शेततळे खोदकामासाठी भरीव आर्थिक तरतुद असलेली शासनाची कोणतीही योजना कार्यान्वित नाही. त्यामुळे राज्य शासनाने "मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन" योजनेचा विस्तार करून त्यामध्ये वैयक्तिक शेततळ्याचा समावेश या वर्षापासून करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्याच्या अनुदानात 50 टक्के भरीव वाढ केली असून अनुदानाची कमाल मर्यादा रक्कम रूपये 75000 करण्यात आली आहे.
औरंगाबाद विभागास वैयक्तिक शेततळ्यांसाठी एकूण 1740 चा लक्षांक प्राप्त झाला आहे. जिल्हा निहाय वर्गवारी निहाय वैयक्तिक शेतळ्यांचा लक्षांक औरंगाबाद- अनु.जाती-30, अनु जमाती-10, सर्वसाधारण-600, औरंगाबाद एकूण-640, जालना- अनु.जाती - 32, अनु.जमाती-3, सर्वसाधारण-435, जालना एकूण-470, बीड- अनु.जाती-35, अनु.जमाती-5, सर्वसाधारण-590, बीड एकूण-630 , औरंगाबाद विभाग एकूण -1740 सदर योजनेतंर्गत असलेले वैयक्तिक शेततळ्यांचा लाभ घ्यावा, तसेच शेतकऱ्यांनी सदर योजनेसंबंधीत शंका व अडचणीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना संपर्क करावा, असे विभागीय कृषि सहसंचालक, कार्यालयाने पत्रकान्वये कळविले आहे.


0 टिप्पण्या