Ticker

6/recent/ticker-posts

प्रकल्पग्रस्तांचे विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू

प्रश्न तातडीने सोडविले नाही तर आंदोलन आणखी तीव्र करणार - सुधीर फड 

चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो.८८८८११७९७५

परळी -: वैजनाथ वीज निर्मिती केंद्रात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून (शनिवार) आमरण उपोषण सुरू केले आहे. आज अनेकांनी भेटी देऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान मागण्या त्वरीत मान्य झाल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष सुधीर फड यांनी दिला आहे. 
          येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या मुख्य कार्यालयासमोर आजपासून प्रकल्पग्रस्तांनी उपोषण सुरू केले आहे. प्रकल्पग्रस्तांना कायम सेवेत सामावून घ्यावे, 45 वर्षे पूर्ण झालेल्या प्रकल्पग्रस्तांचा निर्वाह भत्ता 30 हजार रुपये करावा, चंद्रपूर पाॅवर स्टेशन येथे प्रकल्पग्रस्तांचे दाखल करण्यात आलेल गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत आदी मागण्यांसाठी हे आमरण उपोषण सुरू केले आहे.
      उपोषणामध्ये महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष सुधीर फड यांच्यासह विलास मुंडे, भगतसिंग ठाकूर, गुलाब अजमिर शेख, ज्ञानेश्वर चांगिरे, प्रशिक ताटे आदी सहभागी झाले आहेत. दरम्यान आमचे तातडीने मार्गी लावले नाहीत उपोषणामध्ये अनेकजण सहभागी होऊन आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा फड यांनी दिला आहे.
       दरम्यान उपोषणामध्ये सर्व प्रकल्पग्रस्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रविण मुंडे, गोविंद महाराज मुंडे, केशव तिडके, विजय पाळवदे, सदस्य सुंदर चाटे, गौतम रोडे, प्रदीप नागरगोजे आदींनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या