Ticker

6/recent/ticker-posts

सेवानिवृत्त पोलीस अंमलदार शेख अब्दुल शेख अमीर यांचा प्रमाणीक पणा..

चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो.8888117975


नांदेड-: सध्याच्या धक्का धक्कीच्या काळात प्रमाणीक माणसे मिळणे हे दुराफास्त झाले आहे. परंतु नांदेड पोलीस दलातून निवृत्त झालेले पोहेकॉ शेख अब्दुल शेख अमीर हे पोलीस कल्याण विभाग नांदेड यांच्या तर्फे चालविण्यात येणाऱ्या पोलीस पेट्रोल पंपावर स्वेछेने नागरीकांची सेवा करीत असुन ते गाईडचे काम करतात. चार दिवसा पुर्वी जेष्ठ नागरीक सुरेंद्र सोहनलाल आवस्थी, वय 62 वर्षे रा. तारासींग मार्केट नांदेड हे पेट्रोल भरण्यासाठी पोलीस पेट्रोल पंप येथे आले असता त्यांचे खिशातून 3008/- रूपये खाली पडले होते. ते पैसे निवृत्त झालेले पोहेका शेख अब्दुल शेख अमीर यांना मिळाले होते. सापडलेल्या पैशाच्या मालकाचा शोध घेणे सुरू होते.

जेष्ठ नागरीक सुरेंद्र सोहनलाल आवस्थी, हे आज रोजी पेट्रोल पंपावर चौकशी करण्यासाठी आले असता शेख अब्दुल अमीर यांने त्यांना सापडलेले 3008/- रूपये त्यांचेच असल्याची खात्री केली. व सदर रक्कम मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे समक्ष कार्यालयात येवुन परत देण्या आली. असे प्रामाणीक व इमानदार पोलीस अंमलदार पोलीस दलात असुन प्रत्येकाने त्याचा आदर्श घेवुन काम केल्यास पोलीस दलाची प्रतिमा उंचावेल अशी भावना मा. पोलीस अधिक्षक यांनी व्यक्त करून शेख अब्दुल अमीर यांचे कौतुक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या