Ticker

6/recent/ticker-posts

खेळ जीवन जगण्याची अनुभव देते

महसुल क्रिडा स्पर्धेचा शानदार समारोप

सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894


यवतमाळ:- खेळामध्ये हार-जीत महत्त्वाची नसून सहभाग घेणे महत्त्वाचे आहे. एकमेकांना बांधून ठेवण्याची जादू खेळामध्ये आहे. खेळ आपल्याला नवीन ऊर्जा, उमेद आणि जीवन जगण्याचा नवीन अनुभव देते. आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मदत करते असे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केले.

महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वऱ्हाडे, दिग्रस उपविभागीय अधिकारी कार्तिकेयन एस, पांढरकवडा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन, सर्व उपजिल्हाधिकारी तहसीलदार तसेच महसूल विभागाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

खेळाडूची कौशल्य,सराव, मैदानावर खेळाडू कशा पद्धतीने मानसिक दृष्ट्या खंबीर आहे, मागे पडला तर पुढे जाण्यासाठी तो स्ट्रॅटेजी काय आखतो या सर्व गोष्टी खेळतांना महत्वाच्या असतात. मैदानात उतरल्यानंतर दोन्ही खेळाडूंची कौशल्य पणाला लागते. जिंकणाऱ्या खेळाडूचा सराव आणि कौशल्य यात बाजी मारतो, असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. विजय झालेल्या संघाचे व खेळाडूंचे अभिनंदन केले तर पराभूत खेळाडूंना पुढील वर्षी जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्यात यावेळी विजेत्या संघांना आणि खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या