रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
परभणी :शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्रतीक कापसे, शुभम गहूहुंगे या विद्यार्थ्यांनी आर्टिस्टिक आणि अक्रोबॅटिक्स या १९ वर्षाखालील विभागीय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.
नुकत्याच औरंगाबाद येथे पार पडलेल्या विभागीय जिमनॅस्टिक कनिष्ठ महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी यश संपादन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात २३ ते २७ डिसेंबर दरम्यान या स्पर्धा संपन्न होणार आहेत. या खेळाडूंना डॉ.संतोष कोकिळ, प्रा.राजेसाहेब रेंगे, संदीप लटपटे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख सदस्य हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव,उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्या डॉ.विजया नांदापुरकर, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रोहिदास नितोंडे,उपप्राचार्य आप्पाराव डहाळे, पर्यवेक्षक नारायण राऊत आदींनी अभिनंदन केले.
फोटो कॅपशन: श्री शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थी विभागीय जिमनॅस्टिक स्पर्धेत प्रथम आल्याबद्दल अभिनंदन करताना प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, डॉ.संतोष कोकीळ, प्रा.राजेसाहेब रेंगे दिसत आहेत.


0 टिप्पण्या