Ticker

6/recent/ticker-posts

‘म्युझिकल फाऊंटन शो’चे आयोजन

रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५


नागपूर.: - फुटाळा तलाव येथे आयोजित‘म्युझिकल फाऊंटन शो’ ला मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘म्युझिकल फाऊंटन शो’ च्या माध्यमातून नागपुरचा ऐतिहासिक आलेख जगासमोर येणार आहे. धकाधकीच्या आयुष्यात हा शो विरंगुळा देत, आयुष्यातून ताणतणाव घालवून आनंद देईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.  

‘म्युझिकल फाऊंटन शो’चे कौतुक करीत मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अतिशय अप्रतिम फाऊंटन शो हा आज पहायला मिळाला आहे. जगातील सर्वात मोठे फाऊंटन नागपुरात आहे, ही अभिमानाची बाब आहे. स्व. लता मंगेशकर यांचे नाव या ‘फाऊंटन शो’ला देण्याचा विशेष आनंद असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. 

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे या‘म्युझिकल फाऊंटन शो’चे आयोजन करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या