Ticker

6/recent/ticker-posts

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य निदर्शने आंदोलन



गौतम सोनवणे जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद मो.8308128457.
औरंगाबाद,मुंबई हायकोर्टाने दिलेल्या गायरान जमिनीवरील अतिक्रम हटवण्याची आदेश दिल्याने या दिलेल्या आदेशाने महाराष्ट्रातील संपूर्ण गायरान धारक भयभित झाले असून या आदेशाविरुद्ध दि. ३०/११/२०२२ बुधवार रोजी दुपारी १:०० वाजता औरंगाबाद जिल्हा व तालुका च्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले ) पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय समोर प्रचंड निदर्शने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील तालुक्यातील गायरान धारक गोरगरीब भूमीहीन मोठ्या संख्येने उपस्थित होते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, महाराष्ट्रातील गायरान जमिनीवर अतिक्रम निष्काशीत कारवाईला स्थगिती घेऊन अतिक्रमण नियमित करावे व या निवेदनाद्वारे आपणास कळविण्यात येते की, आपणास मागील महिन्यात मुंबई हायकोर्टाने गायरान जमिनीवरील अतिक्रम निष्काशीत करण्याचा निर्णय दिला. व त्यानुसार अतिक्रमण निष्काशीत करण्याची आपण ठरवले आहे. परंतु या निर्णयामुळे महाराष्ट्रातील मागासवर्गीय दलीत,भटके विमुक्त अल्पसंख्यांक,ओबीसी गोरगरिबांचे अतोनात नुकसान होऊन ते रस्त्यावर येणार आहे. त्यांच्याकडे राहण्याचे व जगण्याचे दुसरे कोणतेही साधन नाही. कारण त्यांनी १९८० पासून गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेले असून ते जमिनी कसत असून आपले पोट भरत आहे.गायरान धारक तेथे घरे बांधून राहत आहेत. शासनाने १९९१ ला व २०१८ ला गायरान जमिनी नियमित करण्याचे आदेश काढला होता. परंतु आपल्या प्रशासनाने जमिनी नियमित केले नाही. २०११ च्या सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आहे त्यामध्ये दलित मागासवर्गीय यांना अतिक्रमण कारवाईतून वगळण्यात यावे. त्यानुसार गायन धारक व गावठाण अतिक्रम कारवाईला स्थगिती देण्यात यावी. म्हणून आपणास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्षाच्या वतीने अशी मागणी करण्यात येते की, गायरान जमिनीवरील व गावठाण जमिनीवर अतिक्रमण निष्काशीत करण्याचा कारवाईला शासनाने स्थगिती देण्यात यावी. तसेच शासनाने कोर्टात पूर्णविलोकन याची १९८० पासून ते २०११ पर्यंत गायरान जमिनीवरील अतिक्रमण घरांचे व जमिनीचे अतिक्रमण नियमित करावे. व रमाई घरकुल योजना तसेच पंतप्रधान आवास योजनेमार्फत गावागावात घरे बांधून द्यावीत. तसेच महात्मा फुले विकास महामंडळ व अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कर्ज प्रकरणे मोठ्या प्रमाणात निधी अभावी प्रलंबित आहे ती निकाली काढण्यात यावी. अशा विविध मागण्या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने प्रचंड निदर्शने आंदोलन करण्यात आले. सदरचे आंदोलन पक्षाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाबुराव कदम दादा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. आंदोलनामध्ये उपस्थित असलेल्या गायरान धारकांना संबोधित करताना कदम दादा म्हणाले की, गायरान जमिनीच्या संदर्भात काही दिवसापूर्वी मुंबई हायकोर्टामध्ये एका माथेफिरुने याचिका दाखल केली ही याचिका दाखल केल्यानंतर हायकोर्ट निर्णय देऊन टाकला. की गायरान जमिनीवरचे अतिक्रमण काढा, गायरान जमिनीवरचे घरे काढा, वास्तविक पाहता हायकोर्टाने दिलेल्या निर्णय चुकीचा होता. या माथेफीरुने याचिका जरी दाखल केली तरी हायकोर्ट याचिका घेत नाही. पण या माथेफीरुची हायकोर्टाने याचिका दाखल करून घेतली. या कोर्टाच्या आदेशानंतर महाराष्ट्र शासनाला आदेश दिले की, ३१ डिसेंबर पर्यंत गायरान जमिनीवर ज्यांचे ज्यांचे घर असतील ते काढून टाकण्यात यावे. म्हणून या निर्णयामुळे महाराष्ट्रात खळबळ माजली महाराष्ट्रामध्ये आमचा गोरगरीब माणूस दलित, मुस्लिम, अल्पसंख्यांक, ओ.बी.सी,भटके विमुक्त गोरगरीब सर्व समाजातले लोक गायरान जमिनी कसत आहेत. काही ठिकाणी गायरान जमिनीवर गायरान धारक आप आपले घरे बांधून राहतात. म्हणून या जमिनीला कुठल्याही प्रकारचा माणूस हात लावता कामा नये, हात लावला तर आम्ही त्याचे हात कलम केल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने घेतलेली आहे. म्हणून आपल्या माणसाचे एकही घर आपण हटवू देणार नाही. कारण अनेक वर्षापासून आपण गायरान जमिनी कसत आहोत, अनेक वर्षापासून आपण गायरान जमीनवर पीक घेतो, गायरान जमिनीवर आपण घरे बांधून राहतो. "ही जमीन यांच्या कोनाच्या बापाची नाही, ही जमीन आमच्या बापाची आहे" डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून सांगितले की, ज्या ज्या ठिकाणी गायरान जमिनी असेल त्या त्या ठिकाणी गायरान जमीन आपल्या ताब्यात घ्या, कारण आम्हाला राहला घर नाही, आणि कसायला जमीन नाही, म्हणून शासनाची जी जी जमीन असेल त्या जमिनीवर अतिक्रमण करून आपल्याला राहण्याचा आणि जमीन कासण्याचा अधिकार आपल्याला या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे. म्हणून आज पर्यंत आठवले साहेबांच्या माध्यमातून आठवले साहेब ज्यावेळेस महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री होते त्यावेळेस आपण औरंगाबादला कॅबिनेट ही बैठक घेतली होती. आणि आपण आठवले साहेब मंत्री असताना आपण प्रचंड असा मोर्च्या काढला होता. आणि तेव्हापासून आपण १९९१ पर्यंतचे गायरान जमिनीचे प्रकरणे देखील नियमित केले. किमान पाच लाख लोकांना गायरान जमिनी आपण नियमित करून दिलेली आहेत. आणि १९९१ नंतर २०११ पर्यंत आपण पुढची मागणी केली होती. म्हणून २०११ पर्यंतचे आमचे अतिक्रमणे आहेत आणि हे कुठल्याही प्रकारच्या अतिक्रमन मी काढू देणार नाही. उलट हे अतिक्रमणे नेहमी नियमित केले पाहिजेत. आणि कोर्टाने शासनाला जो त्या कारवाईला आदेश दिला त्या आदेशाला शासनाने स्थगीती दिली पाहिजे. ही मागणी घेऊन आपण आयुक्त कार्यालयावर आपण आलात आपल्याला आयुक्ताने सांगितले की, याबाबत पूर्णविलोकन याचिका दाखल केलेली आहे. म्हणून या पुढच्या काळामध्ये आपणास कोणतीही आणि कुठलाही अधिकारी नोटीस घेऊन आला तर त्या नोटिसला फाडून टाका, त्याला लाथ मारून हाकलून द्या, तुमच्या पाठीशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले) हा पक्ष खंबीरपणे उभा आहे. तुमच्या पाठीशी रामदास आठवले यांचा पक्ष उभा आहे. तुम्हाला कसलीही प्रकारची भीती नाही, तुम्हाला घाबरायचे कारण नाही, म्हणून आपण या पुढच्या काळात आपण अधिकाधिक गायरान जमिनीवर राहिला पाहिजे असे कदम दादा म्हणाले. डाॅ.बाबासाहेबांचा विजय असो,गायरान जमीन आमच्या हक्काची नाही कुनाच्या बापाची,बोल दलीता हल्ला बोल,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचा विजय असो,रामदास आठवले तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है,बाबुराव कदम दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है,अशा गगनभेदी घोषनांनी परिसर दणानुन गेला होता.यावेळी महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाबुराव कदम दादा,दौलत खरात (महाराष्ट्र उपाध्यक्ष), मिलिंद अण्णा शेळके (मराठवाडा अध्यक्ष), किशोर थोरात (महाराष्ट्र उपाध्यक्ष),अमोल भैया नरवडे( मराठवाडा प्रदेश संघटक), एसडी मगरे, दिलीप प्रमुख (मराठवाडा उपाध्यक्ष),अरविंदआवसरमल काका ( मराठवाडा सचिव),बाळकृष्ण इंगळे (जिल्हाध्यक्ष) संजय ठोकळ (जिल्हाध्यक्ष), नागराज गायकवाड (औरंगाबाद शहराध्यक्ष),राकेश पंडित (युवक जिल्हाध्यक्ष), प्रवीण नितनवरे( जिल्हा सरचिटणीस) युवा नेते जयकिशन कांबळे, प्रकाश गायकवाड, पवन हिवराळे, देवराज वीर, लक्ष्मण हिवराळे, विश्वनाथ दांडगे, प्रशांत वाकळे, भानुदास कीर्तीशाही, जे.के अमराव, जगन्नाथ साळवे मामा (पैठण तालुका अध्यक्ष), विष्णू खंडागळे (पैठण तालुका उपाध्यक्ष), गौतम सोनवणे (पैठण तालुका उपाध्यक्ष) यांच्यासह औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील पैठण, वैजापूर, गंगापूर, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, सोयगाव, खुलताबाद, आदी तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गायरान धारक नागरिक महिला मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या