Ticker

6/recent/ticker-posts

ट्रकच्या धडकेत युवा मजुर जागीच ठार


पिंपळगाव/सडक राष्ट्रीय महामार्गावरील घटना  

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324


भंडारा:- भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने महामार्गवरील वृक्ष लागवड व देखरेखीचे काम करणारा युवा मजुर जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३:४५ वाजताच्या सुमारास घडली. अतुल हरिभाऊ झिंगरे(३०) रा. खैरी/बाम्हणी, ता. लाखनी असे मृतक मजुराचे नाव असून तो १२ वर्षापासून अशोका बिल्डकॉम लिमिटेड कंपनीत कामावर होता. 
           अतुल नेहमी प्रमाणे ३ ते ४ मजुरासह महामार्गाचे मध्यभागी असलेल्या डीवायडरवर वृक्ष लागवड आणि पाणी देण्याचे काम करीत असे. आज पिंपळगाव/सडक येथील पटाचे दानी समोर काम सुरू होते. काम करीत असतांना महामार्गावर उभा असलेला अशोक कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३६ डी ८०९२ मध्ये ठेवलेले पाणी पिण्याकरिता गेला असता लाखनी कडून साकोली कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक क्रमांक सीजी ०८ एल ०८२९ चे चालकाने आपले ताब्यातील ट्रक लापरवाहीने व निष्काळजीपणे भरधाव वेगाने चालवून ब्यारिकेट्स लाऊन ट्रॅक्टर ला धडक देऊन अतुललाही धडक दिल्याने त्याचे डोक्याला जबर मार लागून अतिरक्तस्राव झाल्याने तो जागीच ठार झाला. घटनास्थळावर उपस्थितांनी घटनेची माहिती लाखनी पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस पथक घटनास्थळी पोहचले. सर्व सोपस्कार आटोपून मृतदेह उत्तरीय परिक्षणासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविला. लाखनी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृतक अतुल हा अविवाहित असून वृद्ध आई वडील आहेत. घरातील कमावत्या व मन मिळाऊ अतुल च्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या