Ticker

6/recent/ticker-posts

लाखनी तालुक्यात ७३ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार



मुदत संपणाऱ्या ५१ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक 

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324


भंडारा :- नोव्हेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ५१ ग्रामपंचायतीमधील ५१ सरपंच आणि ४६४ ग्रामपंचायत सदस्य निवडीकरिता १८ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे . त्यात सरपंचाकरिता १५२ आणि सदस्यकरिता ८५६  उमेदवार निवडणूक रिंगणात असून ७३ हजार १४४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात ३६ हजार ७७५ पुरुष आणि ३६ हजार ३६९ महिला मतदार आहेत . मतदानाकरिता १६९ मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. 
       साकोली व लाखांदूर तालुक्याचे विभाजन करून लाखनी तालुक्याची निर्मिती करण्यात आली . ५१ ग्रामपंचायतीत १०४ गावे समाविष्ट असून नोव्हेंबर २०२२ मध्ये ५१ ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने रविवार (ता १८) निवडणूक होणार आहे . १६० प्रभागातून ५१ सरपंच आणि ४६४ ग्रामपंचायत सदस्यांची निवड होणार आहे . २३२ महिलांचा समावेश आहे.अनुसूचित जातीचे ८२ , अनुसूचित जमातीचे २१ , नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) ५८ आणि सर्वसाधारण गटातून २५२ सदस्य निवडून येणार आहेत. त्यापैकी अनुसूचित जाती ४७ , जमाती १४ , नामाप्र ४१ , सर्वसाधारण १३० महिला सदस्यांचा समावेश आहे. 
       ५१ सरपंचांपैकी अनुसूचित जाती ९ , अनुसूचित जमाती ४ ,नागरिकांचा मागास प्रवर्ग १३ ,सर्वसाधारण २५ असे आरक्षण निश्चित करण्यात आले असून अनुसूचित जाती ६ , जमाती १ , नामाप्र ६ , सर्वसाधारण १४ अश्या २७ ग्रामपंचायतीत महिला सरपंच राहणार आहेत. सरपंचाचे ५१ जागेकरिता १५२ आणि सदस्याच्या ४६४ जागेसाठी ८५६ उमेदवार निवडणूक रिंगणात असून १६९ मतदान केंद्रावर ३६ हजार ७७५ पुरुष व ३६ हजार ३६९ महिला अशी एकूण ७३ हजार १४४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या