रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
वर्धा :-फिर्यादी श्री रोशन निळकंठ बनसोड, वय ३६ वर्ष, रा. जामणी (पोलीस पाटील) यांनी दिनांक ३०-०३-२०२२ रोजी पो.स्टे. कारंजा (घा.) येथे तक्रार दिली की, नागपुर ते अमरावती हायवे रोडवरील हेटीकुंडी फाट्याजवळ रोडने एक अनोळखी पुरूष इसमाचे वय ६० ते ६५ वर्ष वयोगटातील प्रेत मिळुन आले आहे. अशा रिपोर्टवरून पो.स्टे. कारंजा येथे दिनांक ३०-०३-२०२२ रोजी अप.क्र. ९३/२०२२ कलम ३०२ भादंवि. अन्वये गुन्हा नोंद करून तपासावर घेण्यात आला.
सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा मार्फतीने करीत असतांना सदर गुन्हयातील मृतक हा अनोळखी असल्याने त्याचे ओळख पटविणे संबंधाने स्थानिक पोलीस स्टेशन, जिल्हा नागपुर, नागपुर ग्रामीण, अमरावती शहर, अमरावती ग्रामीण, भंडारा, गोंदीया तसेच मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश येथील स्थानिक पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष जावुन हरविलेल्या इसमांची तपासणी करून मागील ८ महिन्यात सतत अनोळखी मृतक इसमाची ओळख पटविण्याकरीता कसोशीने प्रयत्न करण्यात आला. परंतु गुन्हयातील अनोळखी मृतकाची ओळख पटत नव्हती.
तसेच घटना वेळेस महामार्गावरील येणारे जाणारे संपुर्ण वाहने यांची कारंजा टोल तसेच वडधामना टोल येथुन माहिती प्राप्त करून त्याचे बारकाईने अवलोकन करून संपुर्ण जवळपास ७००० वाहने तपासण्यात आली. तसेच घटनास्थळाचे बाजुने असलेल्या हायवेवरील संपुर्ण हॉटेल, धाबे, पेट्रोलपंप यांची बारकाईने तपासणी करून तेथील फुटेज प्राप्त करून त्यांची देखील पडताळणी करण्यात आली. तसेच घटनास्थळाची व परिसराची तांत्रिक बाबींवर भर देवुन पडताळणी करण्यात आली. तसेच आजुबाजुचे पो.स्टे. ला दाखल होत असलेल्या मिसींगवर बारकाईने अभ्यास करण्यात आला. सदर गुन्हा तपासावर असतांना व समांतर तपासदरम्यान पो.स्टे. कोंढाळी, जि. नागपुर ग्रा. येथे दाखल मिसींग क्र. २३/२०२२ नोंद असुन त्यातील हरविलेला इसमाचे वर्णन सदर गुन्हयातील मृतकाच्या वर्णनाशी अगदी मिळते-जुळते दिसुन आले. त्यातील हरविलेला इसम डोरीलाल उर्फ राजु बन्सीलाल नागवंशी, रा. जरूड, ता. वरूड, जि. अमरावती येथील नातेवाईक मुलगा प्रकाश राजु नागवंशी, वय ४० वर्ष, दोन्ही रा. जरूड जि. अमरावती व त्याची पत्नी सुमित्रा डोरीलाल नागवंशी यांचेकडे प्रत्यक्ष जावुन गुन्हयातील अनोळखी मृतकाचे त्यांना फोटो दाखविण्यात आले. मृतकाचे मुलाने मृतक हा त्याचे वडील डोरीलाल उर्फ राजु नागवंशी असल्याचे तसेच सुमित्रा नागवंशी हिने तिचे पती असल्याचे स्पष्ट सांगितले.
यावरुन पोलीसांनी गोपनिय बातमीदार, प्रत्यक्ष साक्षीदार तांत्रिक तपासाचे माध्यमातुन दिनांक २२-१२-२०२२ रोजी ओम नामदेवराव पठाडे, वय ३६ वर्ष, रा. सावळी खुर्द व सुनिल वामनराव ढोबाळे, वय ३२ वर्ष, रा. सावळी खुर्द यांना विचारपुसकामी ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेवुन मृतक डोरीलाल नागवंशी याचे मृत्युबाबत विचारणा केली असता, ओम नामदेव पठाडे याने त्याचेकडे असलेल्या गायींपैकी ३ गायी मृतक डोरीलाल नागवंशी याने चोरी करुन विकल्या व त्याचेकडील उसने घेतलेले १४,००० रूपये सुध्दा परत देण्यास नकार दिला होता, त्यामुळे त्याचा मृतकावर राग होता. मृतकासोबत गाय चोरण्याचे व पैशाचे वादात ओम पठाडे व सुनिल ढोबाळे यांनी संगणमत करून डोरीलाल नागवंशी याला मारल्याचे सांगितले आहे. तसेच कोठयावरून मृतकाचे प्रेत त्यांचे मोटार सायकलवर हेटीकुंडी फाट्यालगत हायवेवर आणुन टाकले, असे आरोपीतांनी गुन्हयाबाबत कबुली दिली आहे. तसेच गुन्हयात वापरलेले वाहन सुध्दा जप्त करण्यात आले असुन पुढील तपास सुरु आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरूल हसन यांचे मार्गदर्शनात मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, आर्वी श्री. सुनिल सांळुखे, पो.नि. संजय गायकवाड, पो.नि. दारासिंग राजपुत, पोउपनि. अमोल लगड, पोलीस अंमलदार रणजित काकडे, राजेश तिवस्कर, विकास अवचट, प्रदीप वाघ, गोपाल बावणकर, अंकीत जिभे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी तसेच कापटे, पो.स्टे. कारंजा यांनी केली.


0 टिप्पण्या