राज्यपाल महोदय, चंद्रकांत पाटील, अंधारे,राऊत ,राहूल गांधी आणखी अनेक नेते जे सार्वजनिक ठिकाणी बोलले ते ते त्यांचा अभ्यास,आकलन,समज यावर अवलंबून आहे.आपल्या मनात ज्या नेत्याविषयी आधीच कटूभाव असतो.त्याला हे असे बोलणे निमीत्त सापडते.मोर्चा काढणे,बैनर वरील फोटो जाळणे, फोटो ला चप्पलने मारणे, गुन्हा नोंदवण्याचा आग्रह करणे. ही भुमिका आपल्या पक्षाची किंवा स्वताची वैचारिक धारणेवर अवलंबून असते.अशी अनेक वक्तव्ये बाबत पोलिसात तक्रार व कोर्टात खटला दाखल करूनही त्यात काहीही तथ्य आढळले नाही.आतापर्यंत अनेक वक्तव्य बाबत खटले चालले.पण त्यात आक्षेपार्ह काहीच न आढळल्याने ते खटले बोगस ठरले.हे सुद्धा असेच बोगस ठरणार आहेत.फक्त राग व्यक्त करण्यासाठी ते निमीत्त आहे , इतकेच.
राजकीय नेते हे समाजातील लिडर असतात.बुद्धी कमी आधिक असू शकते.प्रामाणिकपणा कमी आधिक असू शकतो.त्यांना परंपरा,कायदा चे ज्ञान असते.ते बोलतात, त्याबाबत त्यांचा अभ्यास तर असतो.ते मान्य करणे अथवा मान्य न करणे हे ज्याचे त्याचे अनुभव किंवा मानसिकतेवर अवलंबून असते.एकाचे दुसऱ्याला आवडले नाही म्हणून तो चुकीचे समजतो.किंवा त्याला काहीतरी लपवायचे आहे किंवा थोतांड करायचे आहे म्हणून तो मोर्चा, आंदोलन वगैरे करतो.या मागील दोन महिन्यांत जे काही वक्तव्य केले त्याबाबत पोलिस किंवा वकीलांचा सल्ला घेतला तर कळते कि यात काहीच आक्षेपार्ह नाही.म्हणून कोणी गांभिर्याने घेत नाही.बातमी बनवणे, प्रसिद्धी करणे इतकाच हेतू साध्य होतो.
राजकीय नेते सत्तेवरील आणि विरोधातील सुद्धा शासकीय, प्रशासकीय कामासाठी असा मोर्चा काढत नाहीत.का? त्यांना आम्ही त्यासाठीच तर आमदार खासदार निवडून देतो.पण ते नको ती नौटंकी करतात.जनतेची दिशाभूल करतात.ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजपाच्या एकाही आमदाराने किंवा खासदाराने जळगाव जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील रस्त्यासाठी मोर्चा काढला नाही.कोरोनाकाळातील अपहार विरोधात मोर्चा काढला नाही.आणि आता भाजप सरकार आहे तर कांग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना वैधानिक कामासाठी मोर्चा काढत नाहीत.हा असे बोलला,तो तसे बोलला.याचेवर गुन्हा दाखल करा,त्याचेवर गुन्हा दाखल करा.यासाठी आपला अमुल्य वेळ वाया घालवत आहेत.ही जनतेची दिशाभूल आहे.ठाकरे , अजितदादा, पटोले यांना जनतेच्या समस्या,अडचणी दिसत नाहीत का? या जळगाव ला आणि काढा मोर्चा रस्त्यांसाठी.या जळगाव ला आणि लावा चौकशी कोरोना काळातील अपहाराची.का नाही? कारण फक्त भाजप नव्हे,आघाडीचे मंत्री, आमदार सुद्धा त्यात दोषी आहेत.लाभार्थी आहेत.
जळगावला गिरीश महाजन व सुरेश भोळे यांनी पाकिस्तानच्या मंत्री विरोधात मोर्चा काढला.तुमचा विरोध कोणाला दाखवायचा आहे? आपले प्रधानमंत्री व राष्ट्रपती यांना कि, पाकिस्तान मधील प्रधानमंत्री व अध्यक्षांना ? केंद्र सरकार भाजपचे आहेत.प्रधानमंत्री व राष्ट्रपती तर भाजपचे आहेत.तर मग मोदीसाहेब आणि राष्ट्रपती महोदया आपले म्हणणे ऐकून घेत नाहीत का?जर ऐकून घेत नसतील तर भाजपात राहून काय उपयोग? कि वरूनच आदेश आहे,तुम मोर्चा निकालो,तब मै देखता हूं.असे तर नाही ना? त्यापेक्षा नागरी सुविधांकडे लक्ष दिले तर आम्ही मताचे पैसे घेणार नाहीत.फुकट मतदान करू.
जळगाव शहरातील रस्ते नुतनीकरण चालू आहे.अनेक ठिकाणी चुकीचे काम चालू आहे.तेथे आमदार सुरेश भोळेंनी लक्ष दिले पाहिजे.२०१४व २०१९मधे प्रतिस्पर्धी कमजोर होते.आता सुरेश जैन जळगाव ला येऊन ठेपले आहेत.सुरेश भोळेंना निवडून येणे सोपे असणार नाही.पैशांचा चुराडा जास्त केला तरीही कठीण आहे.कांग्रेस व राष्ट्रवादी चा थांगपत्ता लागणार नाही.
.... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.


0 टिप्पण्या