रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
सातारा- आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व मानणाऱ्या पळसावडे ता. सातारा ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. पळसावडे येथील सर्व समस्या सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला असून या गावच्या सर्वांगीण विकासाला नेहमीच प्राधान्य दिले जाईल, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कारप्रसंगी दिला.
पळसावडे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असून लोकनियुक्त सरपंचपदी सौ. प्रतिभा जानकर यांची तर, उपसरपंचपदी अनिल जानकर यांची निवड झाली. सदस्यपदी जानु जानकर, सौ. रंजना आवकीरकर, सौ. गंगाबाई शेडगे, सौ. ताईबाई जानकर, सौ. संगीता जानकर, श्रीमती लक्ष्मी जानकर यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर सर्वांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेतली. आ. शिवेंद्रसिंहराजेंनी सर्वांचा सत्कार करून गावच्या विकासासाठी कायम सहकार्य करण्याचा शब्द दिला.
यावेळी बाबुराव रामचंद्र जानकर, रामदास आवकीरकर, बाबुराव आवकीरकर, रामचंद्र शेडगे, लक्ष्मण जानकर, मारुती जानकर, बाबुराव किसन जानकर, शंकर बावधने, किसन कोकरे, पूनम जानकर आदी उपस्थित होते.


0 टिप्पण्या