Ticker

6/recent/ticker-posts

प्रोग्रेसिव्ह इंग्लिश शाळेमध्ये वार्षिक स्नेहसम्मेलन व रंगारंग कार्यक्रम संपन्न २०२२-२३

रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५

भंडारा :- प्रोग्रेसिव्ह इंग्लिश शाळा , स्टेशन रोड , भंडारा तर्फे शिवहरे कलार समाज हॉल स्टेशन रोड , भंडारा मध्ये दिनांक ११/१२/२०२२ रोज रविवार ला शाळेचे वार्षिक स्नेहसम्मेलन आणि रंगारंग कार्यक्रम संपन्न झाले कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटन मा . श्री . लोहित मतानी आय . पी . एस . ( I. P. S ) पोलीस मुख्याधिकारी , भंडारा यांचे हस्ते शारदा मातेचे पुजन करून दिपप्रज्वल , मा . श्री . एस . बी . राठोड गट शिक्षण अधिकारी , भंडारा , श्री . विनोद जाधव , चिफ अॅक्झीकेटिव्ह ऑफिसर , भंडारा , मा . सौ . ज्योती नशीने अतिथी , मा . सौ . अल्का कटकवार सचिव , उमादेवी मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटी गोंदिया , मा . श्री . मानापुरे सर , मा . श्री . विशाल पशिने मुख्याथापक प्रोग्रेसिव्ह इंग्लिश शाळा , भंडारा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले . कार्यक्रमाच्या सुरवातीला पाहुण्याचे श्री . विशाल पशिने मुख्याधापक यांच्या हस्ते पुष्प गुच्छ देउन तथा विद्यार्थ्याच्या सुंदर गीत आणि नृत्याद्वारे सर्वांचे स्वागत करण्यात आले . सर्वप्रथम मा श्री विशाल पशिने मुख्याथापक यांनी आपल्या प्रास्तविकेतुन शाळेच्या सुरवातीपासुन वर्ष २०१२ ते २०२२-२३ असा आजपर्यंतचा शाळेची प्रगतीची वाटवाल आणि काहि आठवणि यांची वाटचाल मांडली व उपस्थित सर्व पालक वर्गाचे अभीनंदन मानले . मा . श्री . लोहित मतानी आय . पी . एस . ( I. P. S ) पोलीस अधीक्षक , भंडारा यांनी विचार व्यक्त करतांना शाळेच्या सिम्बॉल मध्ये ज्याप्रमाणे शिक्षणिक कौशल्ये आणि संशोधन पध्दती अश्या तीन्ही सवयीमुळे विद्यार्थ्याचे जिवन सुशिक्षित होते , आणि ते मला या शाळेमध्ये दिसत आहे , त्यामुळे विद्यार्थ्याना समाजामध्ये आपले जिवन जगण्यात मदत होते मान सन्मान मिळतो . विद्यार्थी जिवनातुन समोर शिक्षण घेतल्यानंतर जगामध्ये वावरतांना त्यांनी प्रामाणिकपणे व्यवहार करायला पाहिजे अश्याप्रकारे त्यानी पालकांना आणि उपस्थितांना संदेश दिला . मा . श्री . एस . बी . राठोड गट शिक्षण अधिकारी , भंडारा , यांनी विद्यार्थी शाळेमध्ये कसा असायला पाहिजे यावर प्रकाश टाकतांना सांगीतले की , शाळेची शिस्तबद्धता त्यांची तळमळ आणि मुख्याधापकांचा अनुशासन आणि कार्यपद्धती यावर सर्व शाळा अवलंबुन असते आणि तशी शाळा प्रोग्रेसिव्ह इंग्लिश शाळा , आहेच अश्याप्रकारे त्यांनी शाळेचे गुणगौरव केला . मा . श्री . मानापुरे सर यांनी सुद्धा व्यक्ति जिवनामध्ये प्रामाणिक राहणे आवश्यक आहे अश्याप्रकारे आपले मनोगत व्यक्त केले .
स्नेहसम्मेलनामध्ये नर्सरी ते ८ वी पर्यंत वर्गाचे सर्व विद्यार्थ्याना आपले सुप्त कला गुण उपस्थितापुढे दाखवुन सर्वाचे मन जिकंले . कार्यक्रमाचे सुत्र संचालन सौ . निकिता सारडा तथा सौ . किर्ती मेश्राम यांनी केले . शेवटी कार्यक्रमाचे आभार सौ . संगीता मानापुरे यांनी व्यक्त केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सौ . सुहानी पशीने , कु . निशा मने , सौ . कविता बसेशंकर , सौ . मोनिका गोखले , सौ . अपूर्वा बारई , कु . स्वेता कावळे , अभिलाषा कांबळे , कु . पुजेश्वरी गिरीपुंजे , सौ . स्वेता ढोमने , सौ . भुमेश्वरी मेश्राम , रोशन बैस , विवेक ढोके , सुनीत मेश्राम , सुरेश गोखले , विक्रम पशिने , अमित शर्मा , सौ . शारदा हट्टेवार , सौ . भुमिका मेश्राम , सौ . सुषमा मेश्राम , सौ . रंजू कावळे , सौ . मनिषा कुंभलकर , रवी साखरकर , रोशन नागोलकर , कोमल चोपकर , विजय आस्वले तथा सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले . .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या