Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे श्रमदान


सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894


चंद्रपूर: आपले कार्यालय व कार्यालयाचा परिसर स्वच्छ व सुंदर दिसावा या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून परिसर स्वच्छ केला.

विविध शासकीय कामाच्या निमित्ताने नागरिकांची, अभ्यागंताची सतत येजा सुरू असते. त्यामुळे त्यांना या परिसरात आल्यावर स्वच्छ व प्रसन्न वाटावे, या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून श्रमदान करण्यात आले. जिल्ह्यातील इतरही कार्यालयांनी आपल्या कार्यालयाचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या