Ticker

6/recent/ticker-posts

अज्ञात ट्रकच्या धडकेत २ महिला गंभीर


राष्ट्रीय महामार्ग ५३ मानेगाव/सडक येथील घटना   

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :-लाखनी तालुक्यातील मानेगाव/सडक येथील मिलन ढाब्या समोर राष्ट्रीय महामार्गाने लाखनी कडून साकोली कडे जात असलेल्या दुचाकीला मागेहून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने दुचाकी वरील महिला गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी(ता. ०७) सायंकाळच्या सुमारास घडली. मनीषा किशोर खाडे(३२) रा. बोंडगाव(देवी) व कल्पना देवचंद हेमने(३५) रा. तावशी, तालुका लाखांदूर गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. पुढील तपास पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात सुरू आहे. 
   मनीषा खाडे व कल्पना हेमणे ह्या आपल्या होंडा ॲक्टिवा गाडी क्रमांक एमएच ३५ एएस ९७७६ ने राष्ट्रीय महामार्गाने लाखनीकडून साकोलीकडे जात असताना मागेहुन येणाऱ्या अज्ञात ट्रक चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे ट्रक चालवुन राष्ट्रीय महामार्गाने जात असलेल्या स्कूटी ला जबर धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश गोसावी, पोलिस हवालदार सुभाष राठोड यांनी उपस्थित नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी ग्रामीण रूग्णालय लाखनी येथे नेले. या अपघातात मनीषा च्या उजव्या हाताला व डोक्याला तर कल्पना चा उजवा पाय मोडलेला होता व डोक्याला जबर मार लागल्याने दोघींचीही प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे त्यांना भंडारा येथील सामान्य रुग्णलयात हलविण्यात आले. ट्रक चालक घटनास्थळावरुन अपघाताची माहिती न देता पसार झाला. मनीषा खाडे यांच्या फिर्यादीवरुण अज्ञात ट्रक चालाकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार निलेश रामटेके करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या