Ticker

6/recent/ticker-posts

जळगाव शहरातील वाघनगरकडून गिरणा पंपींग कडे जाणारा हा रस्ता.जळगांव ते मुंबई रेल्वे लाईन वर

 जळगाव ते शिरसोली दरम्यान हा जळगाव महापालिका हद्दीतील रेल्वे अंडरब्रीज आहे.याच रस्त्यावरून म्हणजे पुलाखालून चार इंग्लिश स्कूल कडे ,आर्यन पार्क कडे,गिरणा पंपींग कडे शाळकरी पोरं, मास्तर, नोकर,स्कॉलर जातात.रोज किमान तीस गाड्या शाळकरी बालकांच्या जा ये करतात.साठ तर इंग्लीश स्पीकींग उच्चशिक्षित मास्तर ,टिचर याच घाणीतून रुबाबाने जा ये करतात.पण या घाणीकडे कोणाचेही लक्ष जात नाही.यातून वाघनगर,हरिविठ्ठनगर चे संडास चे घाण पाणी सोडलेले आहे.किती नालायक आमचे नगरसेवक,ज्यांना हे दिसत नाही?कालच किड्स गुरूकुल इंटरनैशनल स्कूल मधे भारत की आझादीका सुवर्ण महोत्सव मनवला गेला.तेथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ चे कुलगुरू विजय माहेश्वरी प्रमुख पाहुणे होते.ते सुद्धा याच रस्त्यावरून गेले आले असतील.त्यांना सुद्धा ही घाण खटकली नाही.याच घाणीतून प्रवास करून त्यांनी शाळकरी बालकांना कोणता स्वच्छतेचा संदेश दिला असेल?
   जळगाव शहराचे नगरसेवक आणि आमदार तर इतके बधीर आहेत कि, त्यांना ही घाण जाणवलीच नसेल का?रेती माती दारू सट्टाचा धंदा चालवणाऱ्या लोकांना हे कळेलच कसे?
    जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे दोन वेळा आमदार निवडून दिले.ते मोदींचे, फडणवीस यांचे खूप लाडके आहेत म्हणे.कारण त्यांचा व्यवसाय मोदी व फडणवीस यांना खूप आवडतो.त्यांना कधी कळेल कि,ही घाण बालकांच्या आरोग्याला घातक आहे?

मतीवाचून निती गेली.
नितीवाचून अवनती झाली.

... शिवराम पाटील.
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या