रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
हिंगोली:- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यावर अट्रोसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी तसेच त्यांच्यावर शाईफेक करणारे भीमसैनिक मिलिंद गिरबडे, धनंजय इजगज आणि विजय ओव्हळ यांच्यावर सूडबुद्धीने दाखल करण्यात आलेले ३०७,३५३,१२०(ब) सारखे गंभीर गुन्हे मागे घ्यावे यासाठी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांची अशाप्रकारची मुस्कटदाबी अजिबात सहन केली जानार नाही. या सर्व आंदोलकांच्या मागे ऑल इंडिया पँथर सेना खंबीरपणे उभी असुन त्यांच्यावर सूडबुद्धीने दाखल केलेले गुन्हे परत घेतले नाही तर ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी ऑल इंडिया पँथर सेना जिल्हाप्रमुख राहुल पुंडगे, हिंगोली ता. अध्यक्ष सतीश इंगळे, ता. उपाध्यक्ष संघपाल कांबळे, औंढा युवा ता. अध्यक्ष अजय ढेंबरे, अमोल भोकरे, कपिल भोकरे, संतोष ठोके , विश्वामित्र कांबळे, त्रिशरण कांबळे, संदिप इंगळे, तेजस ढेंबरे इ. उपस्थित होते.


0 टिप्पण्या