दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
भंडारा :- महामानव प. पु. भारतरत्न डाॅक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त भंडारा जिल्हा महिला काँग्रेस तर्फे डॉ बाबासाहेब स्मारक समिती त्रिमूर्ती चौक भंडारा येथे आज दिनांक 6/12/2022 रोज मंगळवारला सकाळी 10:30 वाजता पुतळ्याला माल्यार्पण व अभिवादन सभेचे कार्यक्रम घेण्यात आले.
या वेळी महिला जिल्हा अध्यक्ष सौ जयश्री ताई बोरकर यांनी सांगितले आपल्या इतिहासात अनेक विरांच्या कथा आणि आपल्या देशासाठी त्यांचे योगदान हे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या देशांमधील असाच एक नायक म्हणजे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' आपण सर्वजण त्यांना भारतीय 'संविधानाचे जनक' म्हणून ओळखतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान व्यक्तिमत्त्व होते.
आज आपण येथे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर 2022 पुण्यतिथी साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय 'संविधानाचे जनक किंवा शिल्पकार' म्हटले जाते. त्यांनी केलेले कार्य आणि त्यांचे योगदान भारतासाठी खूप मोठे आहे.
डॉ. बाबासाहेब यांना आपण सर्व त्यांना भारतीय 'संविधानाचे जनक' म्हणून ओळखतो पण त्यांचे योगदान एवढ्यापुरते मर्यादित नाही ते एक अतिशय प्रतिभावान व्यक्ती होते. ते राजकारणी, समाज सुधारक, न्यायशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ होते. भारतीय समाजातील अन्यायाविरुद्ध त्यांनी नेहमीच लढा दिला.
यावेळी महिला जिल्हा अध्यक्ष सौ जयश्री ताई बोरकर, अनु जाती महिला विभाग जिल्हाध्यक्ष मंजुषा चव्हाण, महिला शहर अनु जाती शहर अध्यक्ष सारिका नागदेवे, महिला शहर अध्यक्ष पुष्पा ताई साठवणे, तालुका महिला अध्यक्ष स्वाती हेडाऊ, इंटक महिला शहर अध्यक्ष स्नेहा भोवते, भावना शेंडे, सुलभा देशपांडे, नंदा मोगरे व अनेक कार्यकर्त्या उपस्थित होते.


0 टिप्पण्या