सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
अहमदनगर :-
जामखेड शहर हे परिसरातील एक मोठे सांस्कृतिक व व्यापारी केंद्र आहे. परंतु सध्याच्या गुन्हेगारी व गुंडगिरीच्या पार्श्वभूमीमुळे शहर भकास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी खुन, खुनाचा प्रयत्न करणे असे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांचे मोठ मोठे बोर्ड लागले आहेत. यामुळे शहरातील व्यापारी दडपणाखाली आहेत. या बोर्डांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अन्यथा सर्व जातीधर्माच्या लोकांना व व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन बोर्ड बंदीबाबत आंदोलन करणार असल्याचा इशारा जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी दिला आहे.
जामखेड शहरात फ्लेक्स (बोर्ड) बंदी करण्यात यावी यासाठी मागील पाच वर्षांपूर्वी जामखेड शहरात झालेल्या एका शांतता कमिटीच्य बैठकीत ठराव घेण्यात आला होता. या नंतर अनेक महिने बोर्ड लागत नव्हते. परत आता पुन्हा मोठ्या प्रमाणात शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बोर्ड लागणे सुरू झाले आहे. गुन्हेगारांचे मोठ मोठे बोर्ड शहरात लागल्याने शहरातील व्यावसायिक व व्यापारी वर्ग दहशत व दडपणाखाली आहे. यामुळे प्रशासनाने ताबडतोब बोर्ड बंदीचा निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा प्रा. मधुकर राळेभात यांनी पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
एकेकाळी जामखेड शहर म्हणजे गुन्या गोंविदाने नांदणारे शहर म्हणून ओळखले जात होते. हिंदू लोक मुस्लिम सणात हिरिरीने सहभागी होत तसेच मुस्लिम लोकही हिंदू सणात सहभागी होत होते. आनंदाने एकमेकांच्या सणा उत्साहात सहभागी होत. पण अलिकडच्या काळात शहराची संस्कृती बिघडत चालली आहे. व्यापारी वर्ग दडपणाखाली आहे. बोर्ड नसावेत असले तरी ते विकासाबाबत असावेत असे प्रा मधुकर राळेभात यांनी सांगितले.
जामखेड शहरातील सामान्य नागरिक म्हणून विनंती करतो की वाढदिवसाच्या नावाखाली गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या लोकांची, खूनातील आरोपी फरार आरोपी व इतर भागातील गुन्हेगार यांचे फोटो सहीत प्लेक्स जामखेड शहरात लावून शहरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे काम केले जात आहे फ्लेक्स वरील अनेक लोक हे या शहराचे रहिवाशी नाहीत, परंतु त्यांना शहर दहशतीखाली ठेवायचे आहे. या साठी ही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली सामूहिक गुन्हेगारी करणारी गैर कायदेशीर मंडळी जामखेड मध्ये स्वताचे व इतर गुन्हेगाराचे फ्लेक्स लावून शहरामध्ये दहशन निर्माण करत आहेत. प्रशासनाने हे सर्व फ्लेक्स काढून टाकावेत व पुन्हा परवानगी देऊ नये. असेही यावेळी पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


0 टिप्पण्या