रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
गडचिरोली :- वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा गडचिरोलीच्यावतिने भारतीय स्त्री मुक्ती दिन कार्यक्रम येथिल पत्रकार भवनात घेण्यात आले. यावेळी महिला परिषदेने सामाजीक परिवर्तनासाठी विविध ठराव घेतले.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ खुशबू दुर्गे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महिला नेत्या मालाताई भजगवळी होत्या, तर स्वागताध्यक्षा जोत्सना मिसार या होत्या, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ विद्या बांबोळे, सामाजीक कार्यकर्त्या माधूरी दहिकर, जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला आघाडीच्या महासचिव मंजुषा थेरकर, संघटिका प्रज्ञा निमगडे, शहराध्यक्षा रंजना तागडे, जी के बारसिंगे, बाशिद शेख आदि उपस्थित होते.
यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी २५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस हा भारतीय स्त्री मुक्ती दिवस म्हणून घोषित करण्यात यावा, ओबिसींना शिक्षणात व नौक-याात ५२ टक्के आरंक्षण देण्यात यावे, जयपूरच्या कोर्टातील मनुचा पुतळा ताबडतोब हटविण्यात यावा, राज्य पातळीवर आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह परिवार स्थापन केलेली समन्वय समिती रद्द करण्यात यावी, बिल्कीस बानो सामुहीक बलात्कार प्रकरणात आरोपीना सोडून देण्याच्या गुजरात सरकारने घेतलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून बिल्कीस बानोला न्याय मिळवून द्यावा, गर्भाशय व कुटूंब नियोजनासंबंधीत वैद्यकिय शस्त्रक्रिया सरकारने कायद्याच्या चौकटीत आणाव्यात, आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या विधवा स्त्रियांना पूर्णत: कर्ज माफ करण्यात यावे, सुरजागड लोहप्रकल्पात जिल्ह्यातील स्थानिक महिलांना ५० टक्के रोजगार देण्यात यावे आदि ठराव घेण्यात आले.
ठरावाचे वाचन अल्का टेकाम, पुजा गायमुखे, बेबिताई गभाने,विद्या बाबनवाडे , वजूदा शेख, अर्चना भोयर, उज्वला साखरे,भूमिका मेश्राम आदिनी केले तर अर्चना भोयर, निर्मला गोरे , संगिता बोदेले, शकुंतला भोयर,वर्षा हलदर, मनिषा वानखेडे आदिंनी ठरावाला अनुमोदन केले.
कार्यक्रमाची सुरूवात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित डॉ विद्या बांबोळे, डॉ खुशबू दुर्गे , बाळू टेंभुर्णे आदिनी मार्गदर्शशन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा निमगडे यांनी तर प्रास्ताविक विद्या बाबनवाडे यांनी तर आभार मनिषा वानखेडे यांनी मानले. यावेळी महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.


0 टिप्पण्या