Ticker

6/recent/ticker-posts

जैन बांधवांतर्फे दुकाने बंद ठेवून निषेध

सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894

परभणी : झारखंड राज्यातील शाश्‍वत जैन तीर्थराज श्री सम्मेद शिखरजींचे संरक्षण, पावित्र्यता आणि स्वतंत्र ओळख राखावी, या मागणीसाठी जैन समाजबांधवांनी बुधवारी (दि.21) शहरासह जिल्ह्यातील दुकाने पूर्णतः बंद ठेवली.
         झारखंड राज्य सरकारने जैन समाजाचे पवित्र स्थळ असणार्‍या श्री सम्मेद शिखरजी पारसनाथ पर्वतराज गिरीडिहला पर्यटनस्थळ घोषित केल्याचा जैन समाजबांधवांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. झारखंड सरकारच्या या निर्णयाने या पवित्र स्थळाची स्वतंत्र अशी ओळख नष्ट होणार आहे. त्यामुळे सरकारने तो निर्णय तातडीने मागे घ्यावा व शाश्‍वत जैन तीर्थराज श्री सम्मेद शिखरजीचे संरक्षण, पवित्रता आणि स्वतंत्र ओळख कायम राखावी, अशी मागणी केली.
         दरम्यान, जैन समाजबांधवांनी केलेल्या या आंदोलनात जवळपास सहाशेवर दुकाने बंद होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या