Ticker

6/recent/ticker-posts

लाखनीचे उड्डाणपूल दोन महिन्यासाठी बंद करणार



ठाणेदार तायडे यांची माहिती

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :- लाखनी येथील नवनिर्मित उड्डाण पुल  दोन महिन्यासाठी बंद करण्यात येणार असून त्या उड्डाणपुलावरून काही ठिकाणाचे ब्लॉक बदलण्यात येणार आहेत. केसलवाडा/ फाटा हा शाळेचा भाग असल्याने नागरिकांनी डावी व उजवी बाजू पाहूनच आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याची काळजी घेण्याचे आव्हान करीत हा भाग अपघात प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी सांगितले. ते युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्नेहसंमेलन प्रसंगी उद्घाटनिय भाषणात  बोलत होते.                                                
श्री. तायडे यांनी पुढे सांगितले की,  या उड्डाण पुलाचे बांधकाम तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण असून काही ठिकाणचे ब्लॉक्स बदलण्याची गरज असून ते येत्या दोन महिन्यात बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी दोन महिने बंद राहणार असून त्यासाबंधी माझे जे एम सी च्या संचालकासोबत बोलणे झाले असून या पुलावरून सुरू असलेली वाहतूक बंद करण्यात येणार असल्याची संचालकांनी सांगितले आहे . या उड्डाण पुलावरून दररोज नागपूर ते रायपूर असे ५ हजार वाहनांची दररोज वाहतूक सुरू असून त्यावर प्रवासी वाहतूक करत असतात.  काही महिन्यापूर्वी या उड्डाण पुलावर अनेक ठिकाणी अपघात झाले असल्याने या उड्डाण पुलाची तांत्रिक तपासणी करणे गरजेचे झाले असून कंपनीतर्फे आता हा उड्डाणपूल २ महिने साठी बंद राहणार आहे.  दुरुस्तीनंतरच या उड्डाणपुलावरून  वाहतूक सुरू करण्यात येईल .                       तेव्हा पालकांना माझी नम्र विनंती आहे की साइन बोर्ड पाहून रेलिंग पाहून स्थळदर्शक नकाशे पाहून व स्पीड ब्रेकरचा उपयोग करून आपली वाहने चालवावी तसेच युनिवर्सल इंग्लिश मीडियम स्कूलच्या डाव्या बाजूने जाणारा रस्ता हा कंपनीतर्फे पूर्ण करून देणार असल्याचे जे एम सी कंपनीच्या संचालक यांनी सांगितले असून त्याच मार्गाने विद्यार्थ्यांची ने आन करावी जेणेकरून अपघात होणार नाही याची काळजी घेऊनच पालकांनी संबंधित वाहन चालकांना सूचना कराव्या अशी विनंती त्यांनी यावेळी केली.                                    या उडान पुलाचे दोषयुक्त बांधकाम करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याची नागरिकांनी मागणी केली असून हा पूल दोषपूर्ण असताना वाहतूक कशी सुरू केली याचीही चौकशी एन एच आय मार्फत करण्यात यावी व जे एम सी या बांधकाम करणाऱ्या कंपनीवर दंड थोटाविण्यात यावा अशी मागणी लाखनी वासियांनी ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली असून निकृष्ट बांधकाम करणाऱ्या पुलाची निर्मिती झालीच कशी या प्रश्नाचे उत्तर लाखनीवासीयांना मिळणार काय हे प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या