रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
मुंबई :- वंचित बहुजन आघाडीचे शेकडो ग्राम पंचायत सदस्य निवडुन तर आलेच परंतु जवळपास तिनशे ठिकाणी थेट जनतेतुन निवडुन आलेले सरपंच हे प्रत्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत तसेच अनेक ठिकाणी अप्रत्यक्षरित्या स्थानीक आघाडी अथवा परिस्थतीनुसार इतर पॅनल अथवा अपक्ष सरपंचपदी निवडुन आल्याचे त्यांनी जिल्हाध्यक्षांना / तालुकाध्यक्षांना कळवल्याची माहीती आहे. या शिवाय अनेक पदाधिकारी / कार्यकर्ते या पेक्षा ही दुप्पटीने सरपंच व सदस्यपदाचे उमेदवार दोन - पाच किंवा पाच पन्नास मतांनी जरी पराभुत झाले तरी त्यांनी गावांच्या राजकारणात आपल्या नेतृत्वाची धमक व वचक सिध्द करुन दाखवलेली आहे.
हीच एकजुट कायम ठेवुन पुढील वाटचाल ताकदीने करायची आहे कारण आदरणीय बाळासाहेबांनी केलेले दिशा निर्देश लक्षात ठेवुन लढायचे आहे की, आपण जिंकत आलेली लढाई आत्ता हरायची नाही आंबेडकरी विचारांचा भक्कम पाया असेलेल्या तमाम बहुजन वंचितांची सत्ता आणल्या शिवाय आपल्याला सुटका नाही.
सर्व विजयी उमेदवार आणि परिश्रम घेणा-या कार्यकर्त्यांचे मनपुर्वक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा!


0 टिप्पण्या