Ticker

6/recent/ticker-posts

विजेच्या जिवंत तारा पडून तणसीचे ढीग पेटले


दिघोरी/लहान येथील घटना


कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा: - धानाची मळणी करून पाळीव प्राण्यांसाठी शेतात ठेवलेले वैरणाचे(तणसीचे) ढिगावर जिवंत विजेची तार पडल्याने तणसीचे ढीग जळल्याची घटना मंगळवारी (ता. २७) सायंकाळचे सुमारास उघडकीस आली यात गोपाल अशोक धिरण यांचे अंदाजे १५ हजार रुपयाचे नुकसान झाले असल्याने या शेतकऱ्यास वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. 
       गोपाल धिरण हे मोठे शेतकरी असून शेतीस जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करतात . आठवडाभरापूर्वीच त्यांनी आपले शेतातील धानाची मळणी करून पाळीव प्राण्यांच्या चाऱ्यासाठी तणस शेतातच जमा करून ठेवली होती .मंगळवारी दुपारचे सुमारास शेतालगतच्या  उपेंद्र देशपांडे यांचे  शेतातील विजेच्या खांबावर अचानक स्पार्क झाल्याने विजेच्या तारा तुटून  तणसीच्या ढिगावर पडल्याने तणस पूर्णतः जळून खाक झाली.घटनेची सूचना स्थानिक लाईनमैन  यांना देण्यात आली पण त्यांनी दखल घेतली नाही उलट अपशब्द बोलल्याचे नुकसानग्रस्त शेतकरी गोपाल धिरण यांचे म्हणणे आहे.सूचना करताच लाईनमैन वेळेवर आले असते तर तणसीचे ढीग जळण्यापासून वाचले असते .ग्राहकांना योग्य सेवा न देणाऱ्या या लाईनमैन वर महावितरणने योग्य ती कारवाई करावी तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांस नुकसान भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 


 *प्रतिक्रिया/स्टेटमेंट* 


घटनेची माहिती मिळताच मी घटनास्थळावर गेलो तणसीचे ढीग  पूर्णतः जळण्याचे मार्गावर होते पण अंधार पडण्याचे बेतात असल्यामुळे विजेच्या तारा तुटून पडल्याचे दिसून आले नाही तरीही सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्या भागातील वीज पुरवठा  बंद केला.
 *आशिष लुटे, लाईनमैन दिघोरी*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या