कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :- लाखनी तालुक्यातील लाखोरी जिल्हा परिषद क्षेत्रात सिंचनसोयी तथा पायाभूत सुविधा निर्मितीकरीता आवश्यक तो निधी उपलब्ध करावा याकरिता आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे नेतृत्वात सामाजिक कार्यकर्ते व नवनिर्वाचित सरपंचांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थानी भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली.मुख्यमंत्र्यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
लाखोरी जिल्हा परिषद क्षेत्रात १८ गावांचा समावेश होत असून हा मागास परिसर म्हणून जिल्ह्यात ख्याती प्राप्त आहे .या गावातील शेतजमीन मुख्यतः पावसाचे पाण्यावर अवलंबून असल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती शेतकऱ्यांचे पाचवीला पुजलेली असतें यावर मात करण्यासाठी करचखेडा उपसा सिंचन योजनेअंतर्गत धारगाव टप्पा २ करिता आवश्यक तो निधी उपलब्ध करावा तसेच ग्रामीण परिसरात पायाभूत सुविधा निर्मितीकरिता निधी उपलब्ध करावा याकरिता भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे नेतृत्वात नागपूर येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान रामगिरी येथे शिष्टमंडळ भेटले व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. लाखोरी जिल्हा परिषद क्षेत्रातील समस्या सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. शिष्टमंडळात शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख पुरुषोत्तम टेंभरे, लाखनी तालुका प्रमुख देवानंद उके , आमदार भोंडेकरांचे स्विय सहाय्यक नरेश बोपचे , नवनिर्वाचित सरपंच वर्षा महावीर वंजारी नीलागोंदी, गायत्री शांताराम वाघ मोरगाव , सामाजिक कार्यकर्ता खुशाल भुरे , मनोहर पटले ,छत्रपती हटवार , महावीर वंजारी, महेश हटवार यांचेसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.


0 टिप्पण्या