कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :- रत्नसंभव बुद्ध विहार गडेगाव तसेच नालंदा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी(ता.११) गडेगाव(लाखनी) बुद्ध विहार येथे पाली भाषा प्रचार परीक्षा घेण्यात आली. यावेळी मुलांसह महिला व पुरुषही परीक्षेत सहभागी झाले होते. नियंत्रक जितेंद्र भैसारे व सहकारी यांच्या उपस्थितीत ही परीक्षा झाली.
जगभरात बुद्धांचं महत्व अनन्यसाधारण आहे. त्यांचे विचार, त्यांचे आचार आणि त्यांची वाणी माणसाच्या आयुष्याला दिशादर्शक ठरते. पण, हे सगळ त्यांना एका भाषेतून मांडली ती भाषा म्हणजे 'पाली'. जर बुद्धांना समजून घ्यायचा असेल तर अभ्यासकाला पाली भाषा यावी लागते.
पाली भाषा आणि साहित्य या अभ्यासक्रमाचा कालावधी वर्षभराचा आहे. 100 रूपये फी आहे. तर 47 परिक्षासाठी विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षेची वेळ ही रविवारी सकाळी 12 ते 3 असे होते. परिक्षेचं स्वरूप लेखी असून 80 गुणांचा पेपर असेल आणि 20 गुण हे स्वाध्याय गुण म्हणून दिले जाणार आहेत. परीक्षेत 'पाली साहित्य' आणि 'पाली व्याकरण', असे 2 पेपर द्यावे लागतात.
जीतेंद्र भैसारे यांनी सांगितले की, बुद्ध आणि बाबासाहेब
आंबेडकर यांचे विचार जाणून घेण्यासाठी प्रत्येक अनुयायांना पाली भाषेचे ज्ञान देणे हा या परीक्षेचा उद्देश आहे. पहिल्या टप्प्याच्या परीक्षेनंतर दुसऱ्या टप्प्याची परीक्षा जानेवारी महिन्यात होणार आहे. ज्याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जाईल. जेणेकरून अधिकाधिक अनुयायी परीक्षेत बसून पाली भाषेत पारंगत होऊ शकतील.
यावेळी केंद्र प्रमुख अविनाश नंदेश्वर, अजितजी टेंभुर्ण, किशोर नंदेश्वर, उन्नती भैसारे, हंसराज अंबादे, मैपाल नागदेवे अतुल नागदेवे, प्रामुख्याने हजर होते.


0 टिप्पण्या