शिक्षक भारती संघटनेचे तहसिलदार महेश शितोळे यांना निवेदन
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या पूर्वी संपन्न झाल्या (ग्रामपंचायत /जिल्हा परिषद)परंतु मागील निवडणुकांचे मानधन निवडणूक कार्य कर्तव्यावर असलेल्या शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळाले नाही.ते त्वरित द्यावे अशी मागणी शासनमान्य संघटना शिक्षक भारती शाखा लाखनीने तहसिलदार महेश शितोळे यांना केली आहे.
मानधन कर्तव्याच्या दिवशी रोखीने तात्काळ देण्यात यावे असे शासनाचे धोरण असले तरी या धोरणाची मात्र अमलबजावणी केली जात नाही .आलेला निधी स्टेशनरी साठी खर्च केला जातो पण निवडणूक कार्यावर असलेल्या शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या मानधन कडे दुर्लक्ष केले जाते.
यापूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकां गट ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणूक कर्तव्यावर असलेल्या शिक्षक शिक्षकेतर व इतर कर्मचाऱ्यांना मानधन पूर्णपणे मिळालेले नाही त्यामुळे यावेळी मागील बाकी आणि चालू निवडणुकीचे मानधन त्वरित द्यावे अशी मागणी संघटनेने केली आहे.
मानधन न मिळण्याबाबतच्या तक्रारी व वस्तुस्थिती यापूर्वी शिक्षक भारती शासनमान्य संघटनेने राज्य निवडणूक आयोगाला निवेदन देऊन कळविले होते.
तहसिलदार यांना निवेदन देताना जिल्हा कार्याध्यक्ष उमेश सिंगनजुडे, जिल्हा कार्यवाह विनोद किंदले॔, सुभाष चवडे, हरिदास भुरे, संजय वणवे तालुका अध्यक्ष नितीन वाघाये, कार्यवाह पद्माकर सावरकर,उपाध्यक्ष देवराम फटे, हुसेन कानतोडे, दर्याव खंडारे, मोहन बोंद्रे, अनुप सारवे, नागेश टिचकुले
शिक्षक भारतीचे शिलेदार उपस्थित होते.


0 टिप्पण्या