जत संपर्कप्रमुख योगेश जानकर यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
ठाणे : जत तालुक्यातल्या पूर्व भागातल्या ४२ गावांना मायथळ कालव्यातून तात्काळ पाणी देण्याच्या मागणीला मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेंनी मान्यता दिली आहे. म्हैसाळ विस्तारीत योजना पूर्ण होईपर्यंत या गावांना नियमित पाणी पुरवठा होण्यास विलंब होत असल्यानं जतमधील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जत संपर्कप्रमुख योगेश जानकर व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ही योजना पूर्ण होईपर्यंत मायथळ कालव्यातील पाणी व्हसपेठ तलावात सोडून तिथल्या नैसर्गिक प्रवाहाद्वारे पूर्व भागातले आठ तलाव भरण्याच्या मागणीला मुख्यमंत्री साहेबांनी मान्यता दिली असल्याचे योगेश जानकर म्हणाले. सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी तात्काळ पाहणी करून २ दिवसांत अहवाल देण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.


0 टिप्पण्या