माजी जि. प सदस्य आकाश कोरे यांची मागणी
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :- अशोका बिल्डकॉम मार्फत राष्ट्रीय महामार्गावर वृक्ष लागवड करणे व वृक्षांना पाणी देण्याचे काम करीत असताना ट्रक चे धडकेत जागीच ठार झालेल्या अतुल हरिभाऊ झिंगरे खैरी यांचे कुटुंबास अशोका बिल्डकॉम कंपनीने आर्थिक मदत करावी. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश(हेमंत) कोरे यांनी केली आहे.
अतुल झिंगरे हा मागील १२ वर्षापासून अशोका बिल्डकॉम कंपनीत मजूर म्हणून कामावर होता. नेहमी प्रमाणे तो तीन ते चार मजुरांसह राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील पिंपळगाव/सडक पटाची दान येथे रस्त्याचे मध्यभागी असलेल्या डीवायडर वर वृक्ष लागवडीचे कामावर होता. दुपारचे सुमारास त्याला तहान लागल्याने पिण्याचे पाणी असलेल्या ट्रॅक्टर जवळ पाणी पिण्याकरीता गेला असताना ट्रक क्रमांक सीजी ०८ एल ०८२९ चे चालकाने त्याला धडक दिल्याने घटनास्थळावरच त्याचा मृत्यू झाला. तो अविवाहित असल्याने आई वडिलांसोबत राहत होता. घरातील कमावत्या व्यक्तीचे अकाली निधन झाल्यामुळे त्याचे वृद्ध आई वडील उघड्यावर आलेले आहेत. त्यांना अशोका बिल्डकॉम कंपनीने आर्थिक मदत करावी. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश(हेमंत) कोरे यांनी केली आहे.


0 टिप्पण्या