Ticker

6/recent/ticker-posts

महापुरुषांच्या शैक्षणिक कार्याचा अवमान करणाऱ्या चंद्रकांत पाटील ला सत्तेची मस्तीरिपब्लिकन विद्यार्थी सेना

रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५


औरंगाबाद :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत पैठणच्या संतपीठाचे पहिल्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 
"कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी शाळा सुरु केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरु करताना; सरकारने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली." असे बेताल वक्तव्य करून महापुरुषांच्या शैक्षणिक कार्याचा अवमान केला आहे.
मागील काही महिन्यांपासून भाजप शी संबंधित बिनडोक मंत्री-पदाधिकारी हे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून महापुरुषांचा अवमान करत आहेत हे राज्यात दंगली पेटवण्याचे कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे नियोजनबद्ध षड्यंत्र असून ह्या सर्वांची नार्कोटेस्ट करून ह्यांच्या वर खटले भरून अश्या हरामखोरांना तुरुंगात डांबले पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन विद्यार्थी सेना करत आहे.
चंद्रकांत पाटीलांनी समस्त जनतेची जाहीर माफी मागून मंत्री पदाचा राजीनामा द्यावा ह्या करीता रिपब्लिकन सेना जोडेमारो आंदोलन छेडणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या