Ticker

6/recent/ticker-posts

कृषि यांत्रिकीकरणाअंतर्गतऔजारे खरेदी

१५ जानेवारीपर्यंत अर्ज मागविले


सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894

वाशिम : वाशिम हा आकांक्षित जिल्हा आहे. सन २०२२-२३ या वर्षात कृषि यांत्रिकीकरण उपअभियान व कृषि कल्याण अभियानाअंतर्गत सर्व तालुक्यातील निवडक गावांमध्ये कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी भाडे तत्वावर कृषि यांत्रिकीकरण सेवा सुविधेसाठी कृषि औजारे, बॅंक स्थापन करण्याकरीता कृषी औजारे खरेदी करण्यासाठी मुळ किमतीच्या बॅंकेमार्फत ८० टक्के किंवा जास्तीत जास्त ८ लक्ष रुपये अनुदानावर राबविण्यासाठी १५ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्याता मिळाली आहे.

जिल्हयास प्रती तालुका दोन प्रमाणे लक्षांक प्राप्त झाले आहे, तरी इछुक व पात्र सर्व शेतकरी,उत्पादक कंपन्या, शेतकऱ्यांचे स्वयंसहायता गट, शेतकरी उत्पादक गट आणि कृषि विज्ञान केंद्र यांच्याकडून सर्व कागदपत्रासह विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयात सादर करावे.

अर्जासोबत संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, खरेदी करावयाच्या यंत्र/औजारे संचाचे दरपत्रक व परीक्षण पुरावा,आधारकार्ड संलग्न बॅंक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पृष्ठाची छायांकित प्रत,संस्थेशी संबंधित व्यक्तिच्या बॅंक खात्यातुन अनुदान जमा करण्यास संस्थेने प्राधिकृ‍त केले असल्यास प्राधिकृत केल्याचे पत्र व संबंधित व्यक्तिचे आधारकार्ड व फोटो असलेल्या ओळखपत्राची स्वयंसाक्षांकित प्रत आणि विहित नमुन्यातील अर्ज जोडणे आवश्यक आहे.

लाभार्थी संस्था निवडीचे निकष - आकांक्षित जिल्हयामधील केंद्र शासनाव्दारे यापूर्वी निवडलेल्या गावातच या सुविधेचा लाभ देय राहणार आहे. निवड झालेल्या गावाच्या अधीक माहितीकरीता प्रत्येक तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

सदर निवडक गावातुन ट्रॅक्ट्ररची संख्या कमी प्रमाणात असलेली गावे. निवडक गावातुन अल्पश व अत्यल्प जमीनधारकाचे प्रमाण अधिक असलेली गावे. सध्याच्या कृषि उत्पादकता वाढीस वाव असलेली गावे. केंद्र शासनाव्दारे निवडलेल्या गावापैकी यापूर्वी न निवडलेल्या अथवा लाभ न दिलेल्या गावांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर लक्षांकानुसार पात्र अर्जामधुन सोडत पध्दतीने लाभार्थ्यांची निवड उपविभागीय कृषि अधिकारी करतील.याबाबतचा अर्ज १५ जानेवारी २०२३ पूर्वी दुपारी ५ वाजेपर्यंत तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात संपूर्ण कागदपत्रासह सादर करावा. यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. योजनेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी यांच्यानशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या