Ticker

6/recent/ticker-posts

सम्मेद शिखरजीला दिलेला पर्यटन क्षेत्राचा दर्जा रद्द करून ते धार्मिक क्षेत्रच ठेवावे, जैन समाजाच्या वतीने जामखेड बंद


सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :-   तत्कालीन झारखंड सरकारने सम्मक शिखरजी या जैन धार्मिक क्षेत्र तिर्थक्षेत्र बाबत घेतलेल्या निर्णयामुळे तेथे देश परदेशातील मांसाहारी, धर्माला न मानणारे लोक येतील. तेथे रिसाॅर्ट व हाॅटेल उभे राहतील व विध्वंसक प्रवृत्ती फोपावतील व त्याठिकाणचे पावित्र्य तर उर्जा संपेल त्यामुळे झारखंड सरकारने देशातील तमाम जैन समाजाच्या भावनांचा विचार करून या ठिकाणाला दिलेला पर्यटन क्षेत्राचा दर्जा रद्द करून ते धार्मिक तिर्थक्षेत्रच ठेवावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी केले. 
      झारखंड राज्यातील जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या सम्मेद शिखरजी यास पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ आज दि २१ डिसेंबर रोजी सकल जैन समाज जामखेडच्या वतीने जामखेड शहरात बंद पाळण्यात आला. यावेळी शहरातील जैन स्थानक येथुन तहसील कार्यालयापर्यंत मुख मोर्चा काढुन नंतर तहसीलदार यांना जैन समाज्याच्या वतीने निवेदन देण्यात आले. 
       झारखंड मधिल श्री सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ संपूर्ण भारतभर जैन समाजाच्या वतीने निषेध नोंदविण्यासाठी बंदचे आयोजन केले होते. संपूर्ण देशात होत असलेल्या अंदोलनाचा भाग म्हणून हे अंदोलन काळ्या फिती लावून अंदोलन केले. जामखेड बंद ठेवण्यात आले आहे. या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी पाठींबा दिला होता. आज दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता जामखेड शहरातील जैन स्थानक येथुन जैन समाज्याच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा तहसील कार्यालयावर जाऊन धडकला. या ठिकाणी जामखेड चे तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले. 
   यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा .मधुकर आबा राळेभात, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले, आकाश बाफना, अशोक शिंगवी व शरद शिंगवी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की केंद्र सरकार हे धर्माच्या बाबतीत अधिक जागृत आहे .त्यामुळे झारखंड सरकारने पर्यटनक्षेत्र म्हणून घोषित केलेला निर्णय रद्द करून तीर्थक्षेत्रच ठेवावे .झारखंड सरकारने या धार्मिक  स्थळाचे पावित्र्य कमी करु नये .
आम्ही आज जामखेड शहरात शांतता व अहिंसा मार्गाने मोर्चा काढला आहे .पर्यटन स्थळ करणे चुकीचे आहे याचा आम्ही निषेध करतो तसेच हा निर्णय रद्द करवा अशी मागणी सकल जैन समाज्याच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे यांनी निवेदन स्विकारतावेळी सांगितले की जामखेड सकल जैन समाज्याच्या वतीने माझ्याकडे निवेदन प्राप्त झाले आहे .त्यांच्या मागणीचा विचार करून जैन समाज्याच्या भावना शासनापर्यंत पोहचवण्यात येतील असे अश्वासन दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या