तुकाराम मुंडे या प्रामाणिक लोकसेवकाची वारंवार उचलबांगडी करणे हे सरकारचे भ्रष्टाचारी लक्षण आहे. या प्रकरणावरून स्पष्ट होते , सिद्ध होते कि,
महाराष्ट्र विधानमंडळ मधे एकही आमदार,एकही मंत्री किंवा मुख्यमंत्री प्रामाणिक नाहीत.कारण एकानेही प्रामाणिक माणसाचे समर्थन केले नाही.एकतर प्रामाणिक माणूस क्वचितच जन्माला येतो.दुधावरची साय असते तसा तो माणसातील क्रीम असतो.त्याचा आदर आणि कदर करणे जनहिताचे असते. आवश्यक असते.
न्याय मागण्यांचे पांच व्यासपीठ आहेत.एक तर विधानसभा किंवा लोकसभा.दुसरे राज्यपाल किंवा राष्ट्रपती.तिसरे कायद्याचे न्यायालय.या तिन्ही ठिकाणी न्याय मिळाला नाही तर सर्वात मोठे न्यायालय जनता आहे.ज्याला जनता जनार्दन म्हणतात.ते ईश्वर तुल्य असते.त्या व्यासपिठाचा उपयोग महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण,आण्णा हजारे यांनी केला आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्री , राज्यपाल न्याय देत नाहीत.कारण ते प्रामाणिक नाहीत.म्हणून कायद्याचे न्यायालय वापरतो.पण तेथेही खूप उशीर होतो.तोपर्यंत न्यायाची भूक राहातं नाही.म्हणून जनता जनार्दन या न्याय व्यवस्थेचा उपयोग करावा लागतो.
भारतात तीन न्यायव्यवस्था मान्यताप्राप्त आहेत.पार्लमेंटरी ज्युडिशियरी,अडमिनीस्ट्रेटीव्ह ज्युडिशियरी,लिगल ज्युडिशियरी.महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण,आण्णा हजारे यांनी पब्लिक ज्युडिशियरी वापरली.या चारही ज्युडिशियरीवरील विश्वास संपतो तेंव्हा नेचरल ज्युडिशियरीचा वापर काही शिघ्रकोपी लोक करतात.त्यांना आपण नक्षलवादी म्हणतो.
आतापर्यंत आपण पार्लमेंटरी,अडमिनीस्ट्रेटीव्ह,लिगल ज्युडिशियरीचा वापर करीत आहोत.सर्वसामान्य लोक यांच तीन व्यासपिठांचा वापर करून थांबतात.असामान्य लोक पब्लिक ज्युडिशियरीचा वापर करतात.जनता जनार्दन चा न्याय म्हणजे ईश्वरी न्याय समजतात.असा न्याय अनेक देशांत अनेक वेळा मिळाला आहे.भारत व युरोपात या चार व्यासपिठांचा वापर करतात.मध्य आशिया,चीन ,रशिया,कोरीया देशांत पांचवी पद्धत वापरतात.या पद्धतीत एकाला न्याय देण्यासाठी दुसऱ्यावर अन्याय करावा लागतो.अन्यायाची साखळी संपत नाही.म्हणून न्यायाचा तराजू हेलकावे खातो.भारतातील काही लोक या पांचवी न्यायपद्धतीचा वापर करतात.पण ते अद्याप यशस्वी झाले नाहीत.आधिकतम जनतेला ते मान्य नाही.ही पद्धत असुरक्षित वाटते.धोकेदायक वाटते.अविश्वनिय वाटते. प्रलय कडे नेणारी वाटते.
... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव


0 टिप्पण्या