जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894
वर्धा : नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्पाचे (पोकरा) प्रकल्प संचालक परिमल सिंह यांनी पोकराच्या जिल्ह्यातील विविध प्रकल्पाची पाहणी केली तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेऊन प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला.
या बैठकीला प्रकल्प संचालकांसह जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, मुंबई येथील कृषि व्यवसाय तज्ञ डॅा.मेघना केळकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा आत्माच्या प्रकल्प संचालक डॅा.विद्या मानकर यांच्यासह सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पोकरा प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते.
वर्धा जिल्ह्यात पोकराच्या प्रकल्पाला कशी गती देता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. गोदाम उभारणी, अवजारे बँक, प्रक्रिया उद्योग उभारण्याबाबत परिमल सिंह यांनी सुचना केल्या. प्रकल्प उभा करत असताना त्या गटाला प्रकल्पाचे सखोल ज्ञान देता येईल, यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे. ई-वखार पावती राबवण्यासाठी महिला गट, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांना प्रशिक्षण देऊन साक्षर करावे. वेअर हाऊस कार्पोरेशन सोबत चर्चा करून जिल्ह्यातील गोदाम नोंदणी करून घ्यावे याबाबत त्यांनी सूचना केल्या.
तत्पुर्वी प्रकल्प संचालक परिमल सिंह यांनी जिल्ह्यात पोकरा अंतर्गत सुरु असलेल्या विविध प्रकल्पांची पाहणी केली. आष्टी तालुक्यातील तळेगाव येथील पर्णनेत्र शेतकरी उत्पादक कंपनीचा दालमिल उपक्रम, आर्वी तालुक्यातील रोहणा येथील प्रगतिशील शेतकरी स्मिता अविनाश कहाते यांच्या पॉलिहाऊस प्रकल्प, याच तालुक्यातील रोहणा येथील जागृती महिला बचत गटाचा कापूस ते कापड प्रक्रिया उद्योग, सेलू काटे येथील शेतकरी सचिन वाघमारे यांच्या रेशीम शेती प्रकल्पाला भेट देत पाहणी केली.


0 टिप्पण्या