मिलिंद गायकवाड उपसंपादक महा , चित्रा न्यूज मो , 9860179256
उस्मानाबाद :- दिनांक 24 डिसेंबर सरकार जन कल्याणार्थ शासनाच्या अनेक योजनांची निर्मिती करत आहेत पण प्रशासकीय लालफितीत आणि गावातील भ्रष्टाचारी आणि जातीवादी राजकारणामुळे ह्या योजना गरजू विशेषता मागासवर्गीय अनुसूचित जमातीच्या गरीब निराधार वर्षाणो वर्षे घरकुला पासुन वंचित आहेत तर दुसरीकडे काही लाभ घेतलेल्या लोकां ना दोन वेळेस लाभ मिळालेला आहे. घरकुलाचा लाभ लाभार्थ्यां पर्यंत पोहचत नसल्यामुळे यशस्वी रित्या अमंल बजावणी होत नसल्याचं स्पष्ट होत आहे. तर काही घरकुल मंजुर असलेल्यांचे हप्ते (पैसे) पडत नाहीत. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणारी मौजे अणदूरची ग्रामपंचायत आहे. उदाहरणं पहायचे झालेच तर मागासवर्गीय समाजातील वत्सलाबाई किसन गायकवाड ह्या 84 वर्षीय वृध्द महिला आणि कुटुंबीय वर्षानुवर्षे घरकुलाचा लाभ दिला गेला नसल्याने मोडकळीस आलेल्या जीर्ण पडक्या घरात आश्रय घेत आहे आज ना उद्या घरकुल मिळेल या आशेवर पावसा पाण्यात मोडकळीस आलेल्या घरातच जीवन कंठत आहेत. नाईलाजास्तव आश्रया राहावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. वत्सलाबाई किसन गायकवाड वर्ष 84 असून पतीचे वय 90 च्या पुढे आहे. मुली दिल्या घरी आहेत गेल्या अनेक वर्षांपासून घरकुल योजनेचा लाभ मिळेल या आशेवर आपल्या जीवनाचा शेवट होत आलाय तरीही अणदूर ग्रामपंचायतींचा भोंगळ कारभार व काही हातातील लोकांपर्यंतच घरकुलांचा लाभ मिळत आहे बाकी जे अनपड गरजूंना नाहीच त्यामुळे पडक्या घरात राहण्याची वेळ आली आहे व त्याही एकच महिलांचा विषय नसून मागासवर्गीय अनुसूचित जमातीच्या समुहातील शेकडो नागरिक विधवा महिला, परित्यक्त्या या भोंगळ कारभारामुळे वंचित आहेत अशा नागरिकांना ग्रामपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते हे नागरिक महिला भूमिहीन शेतमजूर असल्यामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे त्यामुळे स्वतः चे घर तयार करता येत नाही केंद्र शासनाने 2022 पर्यंत सर्वांना हक्काचं घर देण्याची घोषणा केली असली तरी अशा कुटुंबास घरकुल एक दिवा स्वप्न ठरणार असल्याचे दिसते अशा कुटुंबीयांना घरकुल देण्यात यावेत अशी मागणी वेळोवळी अणदूर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी देविदास चव्हाण यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार मिलिंद गायकवाड यांनी केली आहे परंतु ग्रामसेवक यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. मागासवर्गीय अनुसूचित जमाती नागरिक महिला बहुजन समाजाचे व सर्वांची श्रध्दा असणारे शिक्षण महर्षी दिनदलितांचे कैवारी , 'दुरितांचे तिमिर जावो' असे स्वप्न असणारे कर्मयोगी कै. सि. ना. आलूरे गुरुजी यांना दैवत मानले जात होते त्या नंतर त्याचे पुतणे मा. रामचंद्र आलूरे हे गेल्या दोन वर्षांपूर्वी सरपंच पदाचा पदभार सांभाळला आहे सि. ना. आलूरे गुरुजीचे वारस प्रथम नागरिक व नंतर सरपंच यांना ते सरपंच पदावर विराजमान झाल्यानंतर सर्व मागासवर्गीय व बहुजनसमाजाच्या लोकांना आनंद झाला होता कारण की आता आलूरे गुरुजीचे वारस म्हणून रामचंद्र आलूरे हे देव माणूस आहे बाकीचे आणि यांच्या मध्ये जमीन आणि आसमानाचा फरक आहे आता सर्व गोर गरीबांचाचे कामे होतील सर्वांना हक्काचं घरकुल मिळेल शासकीय योजनांचा लाभ आणि गावातील नागरी समस्यांवर व्यवस्थित होतील असे वाटत होते व सर्व नागरिक महिला आनंदी झाले परंतु प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही त्या मुळे सर्व मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना जे कै. सि. ना. आलूरे गुरुजीनी केलं ते त्यांचे पुतणे रामचंद्र आलूरे यांना जमलं नाही आणि करता ही आले नाही त्या मुळे सर्वांच्याच निराशा झाल्या आहेत.
अजून ही त्यांच्याकडे वेळ आहे निदान येणाऱ्या काळात तरी लोकोपयोगी कामे होतील अशी आशा व्यक्त करत आहेत.


0 टिप्पण्या