Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा गांधी सेवा संस्थेस राष्ट्रपती पुरस्कार प्रदान


रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५


 परभणी :-महाराष्ट्रातील महात्मा गांधी सेवा संघ या संस्थेला दिव्यांग क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणुन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते पुरस्कार देवुन गौरविण्यात आले . यावेळी संस्थेचे सचिव विजय कान्हेकर यांनी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते तो पुरस्कार स्विकारला . सन 1994 साली दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय उराशी बाळगून महात्मा गांधी सेवा संघ या संस्थेची स्थापना परभणी सारख्या छोट्या शहरात करण्यात आली . 2005 साली संस्थेचे पहिले मुख्यालय औरंगाबाद येथे समर्थ नगरातील गांधी भवनात कृत्रिम अवयव निर्माण केंद्राची स्थापना करण्यात आली . नंतर हळूहळू औरंगाबाद , पुणे , हिंगोली , नागपूर , कोल्हापूर , सिंधुदुर्ग , नाशिक , नांदेड , बीड व परभणी सह साऊथ गोवा या ठिकाणी जिल्हा व् पुनर्वसन केंद्राची शाखा निर्माण करून दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी या संस्थेने अविरत कार्य सुरू ठेवले , यामध्ये दिव्यांगांना दिव्यांगांच्या आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे मोफत वितरण होत गेले . तांड्या , वस्तीवरील दिव्यांगांना त्यांच्या दारात जाऊन कृत्रिम अवयव देण्यासाठी संस्थेने सन 2011 मध्ये सुसज्ज अशी मोबाईल व्हॅन तयार केली त्याच्या माध्यमातून दिव्यांगांना साहित्य उपलब्ध करून दिले . केंद्र सरकारच्या एडीआयपी योजनेची सर्वात प्रभावी अंमलबजावणी करणारी स्वयंसेवी संस्था आहे . महात्मा गांधी सेवा संघाने 100 , 000 हून अधिक वृद्ध लोकांना आणि दिव्यांगाना सहाय्यक उपकरणांच्या मोफत वितरणासाठी मेगा शिबिरांची सोय केली आहे . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसोबत दिव्यांग बालकांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी अर्ली डिटेक्शन आणि अ इंटरव्हेंशन प्रकल्पावर महात्मा गांधी सेवा संघ काम करत आहे . राष्ट्रीय श्रवण मिशन अंतर्गत महात्मा गांधी सेवा संघाने एक हजारांहुन लोकांना श्रवण यंत्रांसाठी राज्यव्यापी मूल्यांकन आणि वितरण शिबिरांची सोय केली . महात्मा गांधी सेवा संघाने अकोला जिल्ह्यातील 15 लाखांहून अधिक लोकांच्या घरोघरी सर्वेक्षणाद्वारे पन्नास हजाराहुन अधिक दिव्यांग व्यक्तींच्या सामाजिक आर्थिक स्थितीचे मॅपिंग करणारा प्रकल्प कार्यान्वित केला आहे . अकोला पॅटर्नने दिव्यांगांना धोरण निर्मितीच्या केंद्रस्थानी ठेवून दिव्यांग पुनर्वसनाचा नवा दृष्टीकोन आणला आहे आणि या अभिनव प्रकल्पाची महाराष्ट्रातील इतर जिल्हयांमध्ये देखील अंमलबजावणी केल्या जात आहे . महात्मा गांधी सेवा संघ हे आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चे अधिकृत विक्रेता देखील आहे . इतर वर्टिकलवर महात्मा गांधी सेवा संघ काम करते ज्यामध्ये पॉलिसी डिझाईनिंग आणि अंमलबजावणी , क्सेसिबिलिटी ऑडिट कन्सल्टन्सी आणि तरतुदी , सर्वेक्षण , संशोधन आणि कृती योजना विकास यांचा समावेश होतो .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या