Ticker

6/recent/ticker-posts

"चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे धम्मसंहीता : बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा जनसमर्थन अभियान संपन्न"


रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५

मुंबई :- दि धम्म संहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाद्वारे ॲड. दिलीप काकडे यांचे नेतृत्वाखाली "धम्मसंहिता : बुद्धविहार व्यवस्थापन कायदा जनसमर्थन अभियान" चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे दि. ५ व ६ डिसेंबर २०२२ रोजी राबविण्यात आले. या अभियानांतर्गत स्वाक्षरी व समर्थन पत्र यांचे संकलन करण्यात आले. देशाच्या कानाकोपन्यातून चैत्यभूमीवर उपस्थित असलेल्या आंबेडकर अनुयायांनी या अभियानाला सकारात्मक प्रतिसाद दिला. या अभियानासाठी मुंबई व नवी मुंबई विभागातील सर्व समन्वयकांनी विशेष श्रम घेऊन अभियानाची तयारी केली होती. या अभियनाचे उद्घाटन मा. अशोक तांबे (उपाध्यक्ष- मध्यवर्ती कमिटी बौद्ध समाज सेवा संघ ता. मंडणगड), मा. मिलींद धोत्रे (अध्यक्ष- आनंदायी परिवार प्रतिष्ठान). यांनी केले.
     जनसमर्थन अभियानाला सदिच्छा भेट म्हणून आयु. राजरत्न आंबेडकर, डॉ.ॲड. सुरेश माने, आयु. तानाजी सावंत, आयु. महेंद्र मोरे, आयु. काशिनाथ कांबळे यांनी विशेष उपस्थिती लावली व जनसमर्थन अभियानाला शुभेच्छा दिल्या.
        या अभियानाच्या यशस्वीतेसाठी, डॉ. मुकेश दुपारे, मधूकर(दादा) मर्चंडे, नम्रता काकडे, मनीषा मर्चडें, कुशलकुमार जंगलबाग, अमरीश मेश्राम, शशिकांत भालेराव, सुरेंद्र सरतापे, मुकुंद रोटे, ॲड. मिलन जंगलबाग, मनीषा जंगलबाग, तुषार सोनवणे, संदीप साबळे, सरिता जंगलबाग, सुभद्रा रोटे, रविंद्र रोटे, राहुल रोटे, प्रियंका रोटे, कमळताई डोळस, सुनिता कांबळे, शुभांगी जाधव, अश्विनी प्रधाने, विजया कांबळे, शरद भोसले, बाळकृष्ण जगताप, दशरथ रंजवे, वैशाली तायडे, बाळकृष्ण तायडे, आदर्श रणशूर, गणेश कांबळे, सुमित प्रधाने, महेश जाधव, ऋषिकेश वाघमारे, ऋषिकेश गायकवाड, रमेश भुतके, प्रशांत भूतके, रोहन कडलक, राहुल शिंदे,  गणेश शिनगारे, भानुदास प्रधाने,  स्वप्नील धोत्रे, अंकुश कासारे, संकेश कासारे, राज खैरे, विरेंद्र जाधव, संकेत तांबे, अनिकेत खैरे, आदेश कासारे. यांनी विशेष सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या